Saturday, July 6, 2024

अनिल कपूरची मुलगी रियाच्या लग्नात लावली ‘या’ कलाकारांनी हजेरी, पाहा ग्लॅमरस फोटो

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी आणि अभिनेत्री रिया कपूर हिचे शनिवारी (१४ ऑगस्ट) लग्न झाले. रिया तिचा बॉयफ्रेंड करण बुलानी याच्याशी लग्न केले. तिच्या लग्नाला आज अनेकजण तिला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. खरं तर रियाने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. मेहेंदी, संगीत किंवा इतर कोणताही प्रोग्राम न करता ते दोघे जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत हे लग्न उरकले. त्यांचे हे लग्न अनिल कपूर यांच्या मुंबईमधील जुहू येथील बंगल्यात झाले. लग्न जरी साधं होते, तरीही कलाकारांनी मात्र ग्लॅमरस अंदाजात या लग्नात हजेरी लावली होती. चला तर पाहुयात रिया आणि करणच्या लग्नाला कोणी कोणी उपस्थिती लावली.

मुलीच्या लग्नात अनिल कपूर यांनी निळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर घातले होते. हातात मिठाईचे बॉक्स घेताना ते स्पॉट झाले.

तसेच अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर हिने देखील या लग्नाला हजेरी लावली. यावेळी अर्जुनने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

तसेच अंशुलाने लाल रंगाची साडी परिधान केली होती.

तसेच सेलिब्रेटी स्टायलिश तनया घावरी हिने देखील लग्नाला हजेरी लावली. तिने केशरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तसेच हर्षवर्धन कपूर याने देखील रियाच्या लग्नात हजेरी लावली. तसेच संजय कपूर आणि त्यांची पत्नी महीप कपूर हे देखील त्यांच्या मुलासोबत या लग्न सोहळ्यात पोहोचले. (bollywood celebrity attends rhea kapoor’s wedding)

खुशी कपूर आणि शनाया कपूरने देखील लग्नात हजेरी लावली. यावेळी खुशीने पिवळ्या रंगाचा, तर शनायाने केशरी रंगाचा लेहंगा घातला होता.

तसेच अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर हे देखील लग्नाला उपस्थित होते. त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता.

तसेच सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी देखील लग्नाला हजेरी लावली. यावेळी सोनमने मिंट कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. तसेच तिने यावर हेवी ज्वेलरी घातली होती. तसेच आनंदने राखाडी रंगाचा कुर्ता घातला होता. ते दोघेही एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसत होते.

रिया कपूर आणि करण बुलानी हे दोघे २००९ पासून रिलेशनमध्ये आहेत. याआधी त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे त्यांच्या रिलेशनबाबत आधीपासूनच चर्चा चालू आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जिगरी यारी! अंकुश चौधरी अन् संतोष जुवेकर निघाले भटकंतीला, सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

-‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

-‘शेरशाह’च्या स्पेशल स्क्रीनिंगवेळी बत्रा कुटुंबाला अश्रू अनावर; म्हणाले, ‘चित्रपटात सर्वकाही पाहायला मिळालं’

हे देखील वाचा