मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी अली फजल आणि रिचा चड्ढा अडकणार विवाह बंधनात, मुंबईत रंगणार रिसेप्शन सोहळा

0
83
Ali Fazal And Richa Chadha
Photo Courtesy: Instagram/alifazal9

बॉलिवूडमध्ये अशी अनेक प्रसिद्ध स्टार कपल्स आहेत, ज्यांचे चाहते त्यांच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत. बी-टाऊनच्या याच जोडप्यांपैकी एक अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे स्टार कपल या वर्षी लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, आता त्यांच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार हे जोडपे पुढच्या महिन्यात लग्न करण्याच्या तयारीत आहे.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर वर्षभर एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर आता हे कपल या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. वृत्तानुसार, या महिन्यापासून प्री-वेडिंग विधी सुरू होतील. त्याच वेळी, हे जोडपे 6 ऑक्टोबर रोजी लग्न करणार आहेत, तर 7 ऑक्टोबर रोजी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केले जाईल. याशिवाय 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात येणार आहे. रिपोर्ट्समध्ये असेही सांगण्यात आले आहे की, 4 फॅशन डिझायनर्स लग्नासाठी वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये परिधान करण्यासाठी रिचाचा ड्रेस डिझाइन करतील.

ऋचा आणि अली 2020 मध्येच लग्न करणार होते, ते कोरोनामुळे लांबले. नुकतेच एका मुलाखतीत याबाबत बोलताना रिचाने सांगितले होते की, जेव्हाही आपण लग्नाचे प्लॅनिंग करतो तेव्हा कोरोनाची प्रकरणे सतत वाढू लागतात. अभिनेत्रीने सांगितले होते की, यापूर्वी ती 2020 मध्ये लग्न करण्याचा विचार करत होती, परंतु महामारीच्या वाढत्या केसेस पाहता तिने आपला प्लॅन रद्द केला. यानंतर 2021 मध्येही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लग्नाचा बेत पुन्हा पुढे ढकलावा लागला होता.

हेही वाचा – पैशाच्या कमतरतेमुळे उर्फी जावेदने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, वाचा तिची संघर्षमय कहाणी
‘गौतम गंभीरनं श्रीलंकेचा झेंडा नाचवला सगळं ठीक हाय पण…’, किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत
सलमान खानच्या घरी अचानक पोहचले मुंबई पोलिस, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here