Friday, March 29, 2024

‘गौतम गंभीरनं श्रीलंकेचा झेंडा नाचवला सगळं ठीक हाय पण…’, किरण मानेंची नवी पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत जे त्यांच्या अभिनयाइतकेच सोशल मीडियावर नेहनीच सक्रिय असतात. यामध्ये लोकप्रिय टीव्ही अभिनेताे किरण माने यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. किरण माने यांच्या सोशल मीडिया पोस्ट नेहमीच चर्चेत येत असतात. सध्या त्यांची नवीन पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी श्रिलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्याचा उल्लेख केला आहे. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, आशिया चषक २०२२ स्पर्धेतील अंतिम सामना नुकताच पार पडला. पाकिस्तान आणि श्रिलंका यांच्यामध्ये रंगलेल्या या रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने विजय मिळवला.  या सामन्यानंतर सर्वत्र श्रीलंकेच्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या पोस्ट सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत. यावेळी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने श्रीलंकेचा झेंडा  हातात घेत त्यांचे कौतुक केले. याचवेळी गौतम गंभीरच्या पाठीमागे एक व्यक्ती उभी होती जी हुबेहुब किरण माने यांच्यासारखी दिसत होती.  याच फोटोवरुन किरण माने यांनी फेसबूकवर एक मजेशीर पोस्ट केली आहे, जी सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

या पोस्टमध्ये ते म्हणतात की,”ह्येज्यायला गौतम गंभीरनं श्रीलंकेचा झेंडा नाचवला बिचवला सगळं ठीक हाय… पन त्याच्यामागं त्यो माझा डुप्लीकेट कोन उभा हाय????” असा मजेशीर कॅप्शन दिला आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली असून त्यावर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – ऐश्वर्या रायपासून ते उर्वशी रौतेलापर्यंत ‘हे’ बॉलिवूड स्टार्स झाले ‘या’ आठवड्यात ट्रोल झाले
रणवीर सिंगने कमल हसन यांना पाहून केले असे कृत्य; नेटकरी म्हणाले, ‘ओव्हर एक्टिंग बास कर बाबा…’
स्टेजवरचं मनिष पॉलने केली मलायकाच्या चालण्याची नक्कल, संतापलेल्या मलायकाने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा