हिंदी सिनेसृष्टीमध्ये असे 90 च्या दशकातील चित्रपट लोकप्रिय तर आहेच. पण या चित्रपटांची खास बाब म्हणजे गाणी. याच यादीतील एक चित्रपट म्हणजे दिल तो पागल है. यातील गाणी आणि पार्श्व संगीत यामुळे चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. संगीत दिग्दर्शक उत्तम सिंग यांनी या चित्रपटाचे संगीत तयार करण्यासाठी जवळपास 2 वर्षे घालवली होती. त्या 2 वर्षात त्यांनी 100 ट्यून तयार केल्या होत्या. त्यापैकी 9 च ट्यून निवडल्या गेल्या. यामुळे हा चित्रपटातील गाण्यांनी इतिहास रचला. या चित्रपटाची एक वेगळी स्टोरी आहे जी तुम्ही या आधी कधी ऐकली नसेल. चला तर जाणुन घेऊ…
यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला ‘दिल तो पागल है’ (Dil To Pagal Hai) या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच कोरिओग्राफर शामक दावर यांनी त्यांची अनोखी नृत्यशैली लोकांसमोर आणली होती. या चित्रपटात ‘भोली सी सूरत’ आणि ‘प्यार कर’ यासह 9 गाणी आहेत, जी चित्रपटाच्या रिलीजच्या 25 वर्षांनंतरही मोठ्या प्रमाणात ऐकली जातात. लता मंगेशकर, आशा भोसले यांचा मधुर आवाज आणि उत्तम सिंग यांच्या संगीताची जादू आजही लोकांच्या हृदयात आहे. या चित्रपटातील गाणी आणि नृत्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये नाविन्य आणले. ज्याचे श्रेय यश चोप्रा तसेच संगीत दिग्दर्शक उत्तम कुमार आणि शामक दावर यांना जाते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तम सिंग यांनी जवळपास 2 वर्षांच्या मेहनतीनंतर या चित्रपटासाठी 100 ट्यून तयार केल्या होत्या, त्यापैकी यश चोप्रा यांनी केवळ 9 ट्यूनची निवड केली होती. त्यांच्या मेहनतीला यश आले. चित्रपटाची गाणी आणि संगीत ब्लॉकबस्टर ठरले. ज्याच्या तालावर चाहते आजही नाचतात. ‘दिल तो पागल है’ हा क्लासिक चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट ‘लव ट्रांयगल’ वर आधारित होता. ज्यात अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या.
शामक यांनी ‘धूम 2’ मध्ये ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन, ‘रब ने बना दी जोडी’मध्ये अनुष्का शर्मा आणि शाहरुख खानसोबत काम केले होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, शाहरुखने त्यांना चित्रपटात काम करण्यास भाग पाडले होते. यश चोप्रा यांनीही त्यांना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’मध्ये काम करण्यास सांगितले, पण नंतर त्यांनी नकार दिला, कारण त्यांची नृत्यदिग्दर्शनाची शैली चित्रपटांमध्ये कधीही काम करणार नाही, असे त्यांना वाटत होते.
शामक दावर यांचा चित्रपटात प्रवेश कसा झाला? याविषयी सांगताना ते म्हणतात, ‘माझ्या डान्स क्लासमध्ये गौरी खान यायची आणि शाहरुख खान तिला घ्यायला यायचा. सिगारेट ओढत तो गौरीची वाट पाहत असे. एके दिवशी त्याने मला सांगितले की, एक चित्रपट बनणार आहे. मला वाटतंय की तु त्यात काम करावे. शाहरुखने मला डिनरसाठी बोलावले, पण मी पोहोचल्यावर त्याने मला ‘दिल तो पागल है’ या चित्रपटामध्ये काम करण्यास सांगितले.’
शामक पुढे म्हणतात, ‘तुझी नृत्यशैली चित्रपटात हवी आहे, असे सांगून त्याने मला पटवून दिले. जर शाहरुखने मला आश्वासन दिले नसते तर मी ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट केलाच नसता. माझी नृत्यशैली खूपच वेगळी होती. ती वेस्टर्न नृत्यशैली होती. पण यश चोप्रा यांचा माझ्यावर विश्वास होता आणि शाहरुखने मला आणखी प्रोत्साहन दिले. मला खूप आनंद आहे.की, मी हा चित्रपट केला. या चित्रपटाला रिलीज होऊन 25 वर्षे झाली आहेत आणि आजही हा बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे, ज्याचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले होते. (bollywood-dil-to-pagal-hai-movie-create-history-song-and-background-music)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोठी बातमी: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला
ये है मोहब्बतें फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात, गोव्यात मोठ्या दणक्यात केले लग्न