‘द केरळ स्टोरी‘वरून सुरू असलेल्या वादात एक नवीन प्रकरण सुरू झाले आहे. ‘द काश्मीर फाइल्स‘चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. चित्रपट निर्मात्याने ममता यांच्यावर त्यांची आणि त्यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. निर्माते अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक यांच्या वतीने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याची कॉपी विवेकने सोशल मीडियावरही शेअर केली आहे.
खरे तर, दिग्दर्शक विवेक अग्निहाेत्री (vivek agnihotri) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मी, अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांच्यासह बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी आमची, आमच्या चित्रपटांची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी आणि बदनामीकारक विधाने केली आहेत.”
BREAKING:
I have, alongwith @AbhishekOfficl & Pallavi Joshi, sent a LEGAL NOTICE to the Chief Minister, Bengal @MamataOfficial for her false & highly defamatory statements made with malafide intention to defame us & our films #TheKashmirFiles & upcoming 2024 film #TheDelhiFiles. pic.twitter.com/G2SjX67UOB
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 9, 2023
माध्यमाशी बोलताना विवेकने याबद्दल सांगितले की, ‘मी बराच वेळ गप्प होतो. मात्र, आता पुरे झाले. आज जो कोणी म्हणतो की, हा प्रचार आहे, त्यांनी यावे आणि कोणती चौकट, कोणती गोळी, कोणती वस्तुस्थिती चुकीची आहे हे सिद्ध करावे, अन्यथा आम्ही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करू.’
#WATCH | Yesterday Mamata Banerjee said that 'The Kashmir Files' and my upcoming film which is based on the genocide in Bengal, are propaganda. She said that BJP funds me for the films I make. We have sent a legal notice to CM Mamata Banerjee against the statements she made:… pic.twitter.com/JXGFVRoytT
— ANI (@ANI) May 9, 2023
विवेक पुढे म्हणाला की, “काल ममता बॅनर्जी यांनी माझा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘बंगालमधील हत्याकांडावर’ आधारित आगामी चित्रपटाबद्दल अपशब्द काढले. त्या म्हणाल्या की, ‘काश्मीर फाइल्स’ आणि पुढचा चित्रपट करण्यासाठी भाजप मला प्रायोजित करते आणि निधी देते. हे अतिशय निंदनीय, निव्वळ खोटे आणि निराधार गोष्ट आहे, जी माझ्या उपजीविकेवर परिणाम करते. या गाेष्टी ममताजी राजकारणाखाली त्यांची व्होट बँक खूश करण्यासाठी बोलली आहे.” यासाेबतच दिग्दर्शकाने नोटीसमध्ये ममता बॅनर्जी यांना विचारण्याले आहे की, ‘त्या ज्या बाेलल्या त्याचा आधार काय आहे.’
VERY IMPORTANT:
In this video, I guess, @MamataOfficial didi is talking about me. Yes, I came to Bengal to interview survivors of Direct Action Day genocide instigated by Khilafat. And the role of Gopal Patha. Why are you scared? #TheKashmirFiles was about Genocide and… pic.twitter.com/x7OcaQ4A4k
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 8, 2023
मंडळी, ‘द कश्मीर फाइल्स’ 2022मध्ये रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला. या चित्रपटाने केवळ 3.50 कोटींची ओपनिंग केली. मात्र, 250 कोटींहून अधिक कलेक्शन केले. (bollywood director vivek agnihotri sends legal notice to west bengal cm mamta banerji for defaming )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
करियरच्या टॉपवर घेतलेले लग्नाचा निर्णय आणि अमेरिकेतील जीवनशैली, अश्विनी भावे यांनी सांगितला त्यांचा हा प्रवास
अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ कृतीमुळे अभिनेते मेहमूद झाले होते आपल्याच मानसपुत्रावर नाराज, स्वतःच केला होता खुलासा