Sunday, April 14, 2024

‘पठाण’ चित्रपटाच्या वादामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ची मध्येच उडी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

मोस्ट अवेटेड शाहरुख खान स्टारर चित्रपट ‘पठाण‘ मधील बेशरम रंग गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या घेऱ्यात अडकलं आहे. अनेक राजकारणी आणि कलाविश्वातील कलाकार आपले मत व्यक्त करत आहेत. मात्र, चित्रपटाचा वाद कोणत्या दिशेल नाऊन ठेपणार आहे सांगणे खूपच कठीण आहे. मात्र, सध्या पठाण चित्रपटाच्या वादामध्ये विवेक अग्निहोत्री यांचा द कश्मीर फाइल्स चित्रपट का मधी येतोय नेमकं प्रकरण आहे काय? चला तर जाणून घेऊया.

पठाण (Pthan) चित्रपटाचा वाद काही थांबायचे नाव घेतच नाही. अनेक सेलिब्रिटी आपले वैयक्तीक मत मांडत आहेत. मात्र, चित्रपट निर्माता अशोक पंडित (Ashok Pandit) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वादाने वेगळेच वळन घेतले आहे. नुकतंच अशोक यांनी शाहरुख खान (Shaharukh Khan) याच्या पठान चित्रपटावर होणाऱ्या ट्रोलिंगचे सर्थन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्वीट केले असून आता या वादमध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा द कश्मिर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपटाचे नाव देखिल मध्ये आले आहे.

अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर ट्वीट शेअर करत लिहिले की, “जर विवेक अग्निहोत्रींना शिव्या देणं, ट्रोल करणं योग्य होतं, तेव्हा संपूर्ण इंडस्ट्री शांत बसली होती. आणि पठाण साठी केल्या जाणाऱ्या विचित्र कमेंट्स आणि ट्रोलिंग योग्यच म्हणाव्या लागतील.” यासोबत अशोकजिंनी दुसरी बाजूदेखिल मांडली आणि लिहिले की, “त्यांच्या मते जर कश्मिर फाइल्सवर केलेले शाब्दिक हल्ले चुकीचे होते तर ‘पठाण’ चित्रपटालाही तेच लागू होते.” अशोक यांनी केलेल्या ट्वीटला अग्निहोत्री यांनी सहमती देत रिट्वीट करत लिहिले की, “कश्मिर फाइल्स प्रदर्शनावेळी देखिल चित्रपटाला खूप विरोध केला होता. आणि आता शाहरुखच्या पठाण चित्रपटालाही विरोध करत आहेत.”

अशोक पंडित यांनी पुढे लिहिले की, “आपले विरोधक निवडून त्यांच्यावर निशाना साधण्याची गरज नाही. कधी कधी आपलं शांत राहाणं आपल्या शत्रूंना फार जास्त फायद्यायचं ठरु शकतं, आणि अशा वेळी तुमचा अजेंडा वेगळ्याच हेतूने ठरवलाय म्हणून तुम्ही शांत आहेत असं देखिल म्हटलं जाऊ शकतं. मी ‘उडता पंजाब’ आणि ‘पद्मावत’ सारख्या चित्रपटांना जेव्हा विरोध झाला होता तेव्हा देखिल मी चित्रपटांचीच बाजू घेतली होती. पण त्यावेळेस तच्यावेळेस त्यांना इंडस्ट्रीमधून पाठिंबा मिळाला नव्हता.”

अशोकजिंनी पुढे लिहिले की, “आपल्यामध्येच फूट पडल्यामुळे लोकांनी त्याचा फायदा घेतला आहेत.” पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्यावरुन रोज काहीतरी नवीन वाद पेटतच आहे. त्यासोबतच शाहरुख आणि दीपिकाचे यांंच्याशी जोडलेल्या पूर्वीच्या वादाला पुन्हा उकरुन त्यांच्यावर ट्रोलर्स निशाना साधत आहेत. (director vivek agnihotri on ashok pandit tweet over pathaan controversy)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तेरा घर चला जाएगा! बिग बॉसच्या घरामध्ये गली बॉयने केला पुन्हा एकदा राडा

राजामौलींमुळे चित्रपटसृष्टीची नासाडी? बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्रीने ‘आरआरआर’ चित्रपटावर केली टिका

हे देखील वाचा