दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिवंगत दिशा सालियन हिच्या निधनावरून राजकारण सुरू झाले तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी राजकारण्यांवर त्यांचे नाव बदनाम केल्याचा आरोप केला. दिशा सालियनच्या मृत्यूबाबत राजकीय पक्षांच्या लोकांनी विविध दावे केले होते.
माध्यमातील वृत्तानुसार, भाजप नेते नारायण राणे यांनी काही काळापूर्वी दिशावर बलात्कार करून हत्या केल्याचा दावा केला होता. आता भाजप आमदार नितेश राणे यांनी गुरुवार(दि. 22 डिसेंबर) रोजी पुन्हा दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणासंदर्भात महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
दिशाची आई वासंती सालियन (vasanti salian) यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकारांना सांगितले होते की, “मी माझी एकुलती एक मुलगी गमावली आहे. हे लोक आमची बदनामी करत आहेत. ते माझ्या मुलीचे नाव राजकारणात ओढत आहेत. हे बंद झाले पाहिजे. आम्हाला शांततेत जगायचे आहे.” माध्यमातील वृत्तानुसार, दिशा सालियनने 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्म’हत्या केली होती. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला होता.
घटनेच्या वेळी दिशा हाेती बालपणीच्या मित्रांणसाेबत
मुलीच्या मृत्यूबद्दल वासंती सालियन म्हणाल्या, “त्या दिवशी काय झाले हे आम्हाला आणि पोलिसांना माहीत आहे. तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ती गेली होती. तिचा खून झाल्याचा राजकारण्यांचा दावा आहे जो खोटा आणि चुकीचा आहे.” वासंती सालियनने असेही सांगितले होते की, “दिशाचे लग्न होणार होते आणि घटनेच्या वेळी ती तिच्या बालपणीच्या मित्रांणसाेबत होती.”(bollywood disha salian died 6 days before bollywood actor sushant singh rajput wanted to get married mother vasanti accused politicians narayan rane maligning her name)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुबई पोलिसांच्या चौकशीवर उर्फी जावेदचे मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘माझ्या कपड्यांमुळे…’
अभिषेकला ट्रोल करणाऱ्यांना बिग बींनी दिले चोख प्रत्युत्तर; म्हणाले, ‘तुझी खूप चेष्टा…’