Wednesday, December 6, 2023

दुबई पोलिसांच्या चौकशीवर उर्फी जावेदचे मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘माझ्या कपड्यांमुळे…’

बिग बॉस OTT नंतर प्रसिद्ध झालेली उर्फी जावेद तिच्या विचित्र शैली आणि बोल्ड आउटफिट्ससाठी ओळखली जाते. फराह खान अली, चेतन भगत आणि इतर तिच्या असामान्य फॅशन सेन्सबद्दल तिच्यावर टीका करताना दिसतात. तर दुसरीकडे, रणवीर सिंग, मसाबा गुप्ता यांसारख्या इतर तिचे केस, मेकअप आणि डिझाइनचे कौतुक करतात. अलीकडेच, उर्फी जावेद तिला दुबईमध्ये ताब्यात घेतल्याच्या बातम्यांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेत्री उर्फी जावेद (urfi javed) अलीकडेच तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या शूटिंगसाठी यूएईला गेली होती. शूटिंगदरम्यान पोलिस तिच्या सेटवर पोहोचले, ज्याचे कारण तिच्या कपड्यांबद्दल सांगण्यात आले. उर्फी पुन्हा एकदा शूटच्या वेळी तिच्या रिवीलिंग कपड्यांमुळे अडचणीत आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

मात्र, यावर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिले आहे की, “पोलिस सेटवर आले होते, परंतु तिच्या रिवीलिंग कपड्यांमुळे नाही.” एका मुलाखतीत उर्फीने सांगितले की, “ती ज्या ठिकाणी शूटिंग करत होती तिथे काही समस्या होती आणि त्यामुळे पोलीस सेटवर आले होते. पाेलिसांनी शूटिंग थांबवली. मात्र, ते सार्वजनिक ठिकाण असल्याने आम्हाला चित्रीकरणाची परवानगी होती. माझ्या कपड्यांशी त्याचा काही संबंध नव्हता. आम्ही दुसर्‍या दिवशी उर्वरित भाग शूट केले, त्यामुळे सर्व काही ठीक झाले.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

माध्यमातील वृत्तांमध्ये दावा करण्यात आला आहे की, उर्फीने तिच्या बनवलेल्या पोशाखात इंस्टाग्रामसाठी एक व्हिडिओ शूट केला होता, जो दुबईतील लोकांना आवडला नाही. दुसरीकडे, उर्फीचे विधान या दाव्यांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. (tv actress urfi javed clarifies that police did not arrive to stop the shooting in dubai for her clothes)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिमानास्पद! RRR चित्रपटातील ‘नातु नातु’ गाणं ऑस्करसाठी झालं शॉर्टलिस्ट

दिशा सालियान प्रकरणात ठाकरे कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता, फडणवीसांकडून एसआयटी चौकशीचे आदेश

हे देखील वाचा