Sunday, February 2, 2025
Home बॉलीवूड सिनेप्रेमींनासाठी मेजवानी; ‘छावा’सह फेब्रुवारी महिन्यात ‘हे’ सिनेमे होणार रिलीझ

सिनेप्रेमींनासाठी मेजवानी; ‘छावा’सह फेब्रुवारी महिन्यात ‘हे’ सिनेमे होणार रिलीझ

फेब्रुवारी २०२५ हा महिना बॉलिवूड चाहत्यांसाठी एक रोमांचक महिना असणार आहे. वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात रोमँटिक-कॉमेडीपासून ते अॅक्शन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणते चित्रपट सज्ज आहेत ते जाणून घेऊया.

‘लवयापा’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अद्वैत चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे. यात जुनैद खान आणि खुशी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा तमिळ चित्रपट ‘लव्ह टुडे’ चा हिंदी रिमेक आहे. चित्रपटाची कथा तरुण प्रेमींबद्दल आहे, जी कॉमिक शैलीत सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

हिमेश रेशमियाचा ‘बॅडेस रवी कुमार’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक अ‍ॅक्शन-म्युझिकल चित्रपट आहे ज्यामध्ये हिमेश रेशमिया मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा रवी कुमारभोवती फिरते. यात प्रभू देवा, कीर्ती कुल्हारी आणि सनी लिओनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये आधीच खूप उत्सुकता निर्माण केली आहे.

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत ‘छावा’ हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘छावा’ ची निर्मिती मॅडॉक फिल्म्सने केली आहे.

‘मेरे हसबंड की बीवी’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी तो मोठ्या पडद्यावर येईल. हा चित्रपट मुदस्सर अझीझ यांनी दिग्दर्शित केला आहे. याआधी त्यांनी ‘पती, पत्नी और वो’ सारखा हिट चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग मुख्य भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

तृप्ती डिमरीला मिळाली बायोपिक; या दिवंगत अभिनेत्रीची साकारणार भूमिका
वॉर २ चा धमाकेदार अ‍ॅक्शन झाला सीन ऑनलाइन लीक; व्हिडीओत स्टाईलिश अवतारात दिसले एनटीआर आणि ह्रितिक …

हे देखील वाचा