अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला पाॅर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी १९जुलैला अटक केली होती. परंतू, सोमवारी (२१सप्टेंबर) राजला मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याच पोर्नोग्राफी प्रकरणाशी अभिनेत्री गहाना वशिष्ठचे नाव जोडले गेले आहे. राज तुरूंगातून बाहेर आल्यामुळे गहनाला खूप आनंद झाला आहे. याच आनंदाच्या क्षणी गहणाने एक इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
गहनाने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “खूप खूप अभिनंदन… तुझे स्वागत आहे आरके… तुला सलाम, तू एक खूप धाडसी व्यक्ती आहेस…चीयर्स.” तिच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट्स करत आहेत. राज बाहेर आल्यामुळे अनेक चाहते आनंदी झाले आहेत. तर काही युजर्स गहनाला ट्रोल करत आहेत. एका युजरने लिहिले की, “नवीन काही चित्रपट बनवा.”
काही दिवसांपूर्वी गहनाने स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यावेळी तिने बोल्ड सीन्सविषयी माहिती दिली. पोस्ट शेअर करताना गहनाने लिहिले की, “कोणत्याही माॅडेलला नग्न अवस्थेत शूट करण्यासाठी जबरदस्ती केली जात नाही. असे सीन शूट करताना आम्ही २०जण सोबत होतो. त्यावेळी माझे कोणत्याही प्रकारचे लैंगिक शोषण झाले नाही. मी सेटवर कोणत्याही प्रकारची नशा केली नव्हती. मी पुर्णपणे जागरुक होते. मी एका ऑटोमधून सेटवर गेली होती. मला माझ्या कामाचा मोबदलाही मिळाला. मी एक रेगुल्यर आर्टिस्ट आहे आणि माझे उत्पादन ३लाखांहून अधिक आहे. त्यामुळे तुम्ही प्रोड्युसरवर आरोप करू नका.” तसेच तिने राज आणि तिचा फोटो शेअर केला होता.
माध्यमातील वृत्तानुसार, गहनाला मुंबई पोलिसांनी पाॅर्न व्हिडीओ प्रकरणी अटक केली होती. ती सध्या जामिनावर बाहेर आली आहे. राजच्या अटकेनंतर गहना प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर ती प्रेक्षकांना इराॅटिक आणि पाॅर्न व्हिडीओ बद्दल काही गोष्टी सांगताना दिसली. गहनाने ‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच! कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अन् केसात गजरा घालून स्मिता गोंदकर दिसतेय एकदम सुंदर
-लईच वाईट झालं! वयाच्या २५ व्या वर्षी मराठी अभिनेत्री ईश्वरी देशपांडेचा अपघातात मृत्यू