संगीत क्षेत्रात याे याे हनी सिंग हे एक मोठे नाव आहे. त्याच्या गाण्याने संगीतविश्वात नवे बदल घडवून आणले. कालांतराने हनीने खूप नाव कमावले आणि आज तो खूप पुढे आला आहे. पण त्याच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सगळ्यांसाठीच खास आहेत. नुकतेच हनीनेही त्याचे जुने दिवस आठवत त्याचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हनी सिंगने शेअर केलेले फोटो 2003 मधील आहेत. म्हणजेच हे त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांचे फोटो आहेत.
हनी सिंग (Honey Singh) याने शेअर केलेल्या फाेटाेमध्ये ताे खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “2003 मधले माझे पहिले फोटोशूट, जे माझे गुरुजी अभिनव आचार्यजी यांनी काढले होते, आठवणी.” हे कॅप्शन बघून असे म्हणता येईल की, त्याला त्याचे जुने दिवस खूप आठवतात.
View this post on Instagram
हनी सिंगच्या या फाेटाेला त्याच्या चाहत्यांनी खूप पसंत केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते त्याच्यावर काैतुकाचा वर्षाव करत आहेत. हनीने 2003 मध्ये रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तो भांगडा आणि हिप हॉप संगीत निर्माता बनला.
View this post on Instagram
हनीचा चाहता वर्ग इतका माेठा हाेता की, त्याच्या शोची तिकिटे उपलब्ध रहात नव्हती. मात्र, नंतर असे काही झाले की, हनी अनेक वादांमध्ये घेरला गेला. सध्या, हनी त्याच्या अल्बमवर लक्ष केंद्रित करत आहे त्याचबराेबर ताे बॉलीवूड चित्रपटांसाठी संगीत देखील देत आहे.
हनी सिंगच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बाेलायचे झाले तर, काही काळापासून त्याचे नाव माॅडेल टीना थडानीशी जाेडले जात आहे. टीना हनीच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली हाेती. अलीकडेच ती त्याच्या ‘पॅरिस का ट्रिप’ या अल्बममध्येही दिसली होती. (bollywood honey singh remembers his early days of 2003 shares old pic)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियंका चौधरीच्या नॉमिनेशनवर प्रेक्षकांनी ठोकला अंदाज, ‘बिग बॉस’TRP साठी का निर्मात्याने लढवली शक्कल?
वेस्टर्न लूकमध्ये तेजश्रीच्या हटके अदा, पाहून तुम्हीही व्हाल फिदा