Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड हुमा कुरेशी बनली लठ्ठ महिला! आगामी चित्रपटांचा घेऊ शकता ‘या’ दिवशी आनंद

हुमा कुरेशी बनली लठ्ठ महिला! आगामी चित्रपटांचा घेऊ शकता ‘या’ दिवशी आनंद

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी(Huma Qureshi) आणि सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha) स्टारर ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट बॉडी शेमिंग या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ज्यामध्ये हुमा कुरेशीचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. यासोबतच हे देखील स्पष्ट झाले आहे की, हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हुमा हादरलेल्या आणि अस्वस्थ अवस्थेत माईकवर बसलेली दिसत आहे.

बॉलिवूड चित्रपट समीक्षक तरण आदर्श(Taran Adarsh) यांनी ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. या मोशन पोस्टरमध्ये हुमा कुरेशी स्टेडियम आणि माईकसोबत दिसत आहे. तरणनी पोस्टर शेअर करत हुमा कुरेशीला ट्विट केले: ‘डबल एक्सएल’ फर्स्ट लूक…टीम डबल एक्सएलने चित्रपटातील हुमा कुरेशीचा फर्स्ट लूक अनावरण केला…सहकलाकार सोनाक्षी सिन्हा आणि महत राघवेंद्र…हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात येणार आहे.

‘डबल एक्सएल’मध्ये हुमा कुरेशीचा लूक
‘डबल एक्सएल’ चित्रपटाचा टीझर लाँच झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. आता पहिले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये हुमाचा लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे. सतराम रमाणी दिग्दर्शित ‘डबल एक्सएल’ चित्रपटात झहीर इक्बाल आणि महत राघवेंद्र यांच्यासोबत हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, विपुल शाह, राजेश बहल, साकिब सलीम, मुदस्सर अजीज आणि हुमा कुरेशी यांनी केली आहे.

‘डबल एक्सएल’ चाहत्यांना मिळणार मजेशीर संदेश
चित्रपटाच्या शीर्षकानुसार ‘डबल एक्सएल’ भक्कम शरीरयष्टी असणाऱ्या महिल्यांच्या आऊटफिटची ही कहाणी असणार आहे. हा चित्रपट लोकांना खूप हसवणार आणि चाहत्यांना संदेशसुद्धा मिळणार असे मानले जात आहे. या चित्रपटात हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा अधिक आकाराच्या महिलांचे बॉडी शेमिंग करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना दिसणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अल्पवयीन मुलाच्या खांद्यावर सोपवली सलमानला उडवण्याची जबाबदारी, पोलिसांचा खळबळजनक खुलासा

‘माझी आई एकटीच घर चालवते’ सावत्र वडिलांना टोमणा मारत पलक तिवारीने घेतली आई श्वेताची बाजू

हे देखील वाचा