Wednesday, June 26, 2024

‘मी लोकांच्या प्रेमाचा गुलाम आहे’, राजकारणासाठी चिरंजीवी कधीही सोडणार नाही चित्रपट

तेलुगू सिनेस्टार चिरंजीवी यांना 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) ‘इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर 67 वर्षीय सुपरस्टारने चित्रपटसृष्टी आणि त्याच्या चाहत्यांचे आभार मानले.

माध्यमातील वृत्तानुसार, अभिनेता चिरंजीवी (chiranjeevi) यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “मला हा अप्रतिम पुरस्कार दिल्याबद्दल मी इफ्फी आणि भारत सरकारचे आभार मानतो. काही सन्मान विशेष आहेत आणि हा पुरस्कार त्यापैकी एक आहे. माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. माझी कीर्ती, नाव, सर्व विशेषाधिकार माझ्या चाहत्यांच्या अमूल्य प्रेमामुळे आहेत. चित्रपटसृष्टीचा मी ऋणी आहे.

चिरंजीवीने राजकारणासाठी अभिनय सोडून देण्याच्या आपल्या पूर्वीच्या निर्णयावरही विचार केला आणि आयुष्यात त्याची पुनरावृत्ती न करण्याचा संकल्प केला. ते म्हणतो, “मी 45 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीत आहे. या साडेचार दशकांपैकी एक दशक मी राजकारणात घालवले आहे. मात्र, काही कारणास्तव मला चित्रपटसृष्टीत परतावे लागले. तेव्हा लोक मला कसे स्वीकारतील अशी शंका मनात होती. मी विचार केला की, ते माझ्यावर पहिलेसारखेच प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करतील का?”

ते पुढे म्हणतात, “मला शंका येत होती, कारण पिढी बदलली आहे. मात्र, त्यांच्या हृदयातील माझ्याबद्दलचे प्रेम आणि जिव्हाळा तर कायम राहिलाच, पण तो द्विगुणित झाला. मी माझ्या चाहत्यांना वचन देतो की, मी कधीही चित्रपटसृष्टी सोडणार नाही. मी जगभरातील तेलगू चित्रपट आणि चाहत्यांच्या प्रेमाचा गुलाम आहे. त्या प्रेमामुळेच आज मी इथे आहे आणि मला अशा पुरस्कारांनी सन्मानित केले जात आहे. तुमच्या प्रेमाबद्दल मी ऋणी राहीन.”

महोत्सवाचा समारोप सोहळा पणजीजवळील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत चित्रपटाच्या समारोप समारंभाला उपस्थित होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्व सेलिब्रिटी देखील या चित्रपट महोत्सवाचा भाग बनले. (bollywood iffi 2022 closing ceremony actor chiranjeevi will never leave films for politics an)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुखापतीतून सावरल्यानंतर शिल्पाने ठेवले जिममध्ये पाऊल, शेअर केला भन्नाट व्हिडिओ

शुभ मंगल सावधान! बिग बाॅसमधील ‘हे’ स्पर्धक अडकणार लग्न बंधनात

हे देखील वाचा