Sunday, July 14, 2024

आजाराबद्दल कळताच चिरंजीवीने सामंथाला लिहिलं हृदयस्पर्शी पत्र; म्हणाले, ‘तू परिस्थितीशी झुंजणारी मुलगी…’

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू(Samantha Ruth Prabhu) सध्या मायोसायटिस नावाच्या गंभीर आजाराशी झुंजत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्याना तिच्या आजाराची माहिती दिली होती. समांथाच्या या पोस्टनंतर तिचे चाहते सगळे चिंतेत आहेत. प्रत्येक जण तिला तब्येतीची काळजी घेण्यासाठी विनंती करत आहे. अलीकडेच, साउथ इंडस्ट्रीतील मेगास्टार चिरंजीवी(Chiranjeevi) याने सामंथाच्या नावाने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

चिरंजीवी यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘प्रिय सॅम, वेळोवेळी असे आपल्या आयुष्यात आव्हाने येतात, पण तू परिस्थितीशी झुंजणारी मुलगी आहेस, मला खात्री आहे ती या कठीण काळातूनही बाहेर येशील, त्यासाठी परमेश्वर तुला शक्ति देवो हीच प्रार्थना.” चिरंजीवी यांच्या या पोस्टला शेअर कर समांथानेही त्यांचे आभार मानले आहेत.

सामंथानेही मेगास्टारचे आभार मानले आहेत. अभिनेत्रीने लिहिले, ‘सर तुमच्या प्रोत्साहनपर शब्दांबद्दल धन्यवाद.’ चिरंजीवी व्यतिरिक्त, दुल्कर सलमान, ज्युनियर एनटीआर, लक्ष्मी मंचू, श्रिया सरन, जान्हवी कपूर आणि हंसिका मोटवानी यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी देखील सामंथाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शनिवारी समंथाने ड्रिपसोबत तिचा फोटो शेअर केला आणि सांगितले की, तिला काही महिन्यांपूर्वी या आजाराची माहिती मिळाली. समंथा लिहितात, ‘काही महिन्यांपूर्वी मला मायोसायटिस नावाची ऑटोइम्यून स्थिती असल्याचे निदान झाले. मला वाटले की मी बरे झाल्यानंतर याबद्दल सांगेन, परंतु याक्षणी माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेत आहे. मी लवकरच पूर्णपणे बरा होईन, असा विश्वास डॉक्टरांना आहे. कामाबद्दल बोलायचं तर ती ‘यशोदा’ या आगामी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘फॅमिली मॅन 2’ आणि ‘पुष्पा’मध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘कांतारा’ला यश मिळत असतानाच ऋषभ शेट्टीने सिद्धिविनायकचे घेतले दर्शन

टायगर श्रॉफच्या पायाला जबर दुखापत; व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत

हे देखील वाचा