Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड या स्वातंत्र्यदिनी तुमच्या भेटीला येतायेत ‘हे’ बहूप्रतीक्षित चित्रपट अन् वेबसिरीज; ‘शेरशाह’सह यांचा देखील आहे समावेश

या स्वातंत्र्यदिनी तुमच्या भेटीला येतायेत ‘हे’ बहूप्रतीक्षित चित्रपट अन् वेबसिरीज; ‘शेरशाह’सह यांचा देखील आहे समावेश

या वर्षी स्वातंत्र्य दिन रविवारी येत आहे, याचा अर्थ सर्व वयोगटांसाठी शनिवार व रविवार मजेदार असणार आहे. शोबीज चित्रपट प्रेमींच्या सेलिब्रेटिंग मूडशी ताळमेळ घालत आहे असे दिसून येत आहे. कारण बुधवारपासून वेगवेगळे चित्रपट आणि वेबसिरीज रिलीझ होण्याच्या तयारीत आहेत. तर पाहूयात या वीकेंडला कोणकोणते चित्रपट तुमचे मनोरंजन करायला सज्ज झाले आहेत.

द किसिंग बूथ ३
प्रेम आणि मैत्रीसोबतच संघर्षाची कहाणी असणाऱ्या ‘द किसिंग बूथ’च्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच तिसरा भागही प्रेक्षकांना तितकाच आशादायक वाटत आहे. ‘द किसिंग बूथ ३’ बुधवारी नेटफ्लिक्सवर रिलीझ होईल. (bollywood independence day 2021 these films and web series will be released on independence week)

 

कुरुथी
या मल्याळम थ्रिलरमध्ये पृथ्वीराज सुकुमारन आणि रोशन मॅथ्यूज मुख्य भूमिकेत आहेत. डार्क थ्रिलर प्रेक्षकांना रोलर कोस्टर राईड देणार हे निश्चित आहे, ज्यामध्ये मल्याळम चित्रपट उद्योगातील काही उत्कृष्ट प्रतिभा या चित्रपटासाठी एकत्र येत आहेत. ‘कुरुथी’ बुधवारी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीझ होणार आहे.

 

बेकेट
जॉन डेव्हिड वॉशिंग्टन अभिनीत हा एक राजकीय थ्रिलर आहे. हा चित्रपटाची कथा एका अमेरिकन व्यक्तीच्या अवतीभोवती फिरते, जो एका विनाशकारी अपघातानंतर ग्रीक अधिकाऱ्यांचे लक्ष्य बनतो. हा चित्रपट १३ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीझ होणार आहे.

 

शेरशाह
ज्यांना या स्वातंत्र्यदिनी देशभक्तीची आग अनुभवायची आहे, त्यांच्यासाठी ‘शेरशाह’ परफेक्ट आहे. बहुप्रतीक्षित सिद्धार्थ मल्होत्रा ​​अभिनित हा चित्रपट या आठवड्याच्या शेवटी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीझ होणार आहे. कारगिल शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी देखील आहे. तसेच हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी रिलीझ होणार आहे.

 

भुज: द प्राइड ऑफ इंडिया
अजय देवगण अभिनीत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा भारतीय एकात्मतेचा गौरव दाखवणारा चित्रपट आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट १३ ऑगस्टला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीझ होईल.

 

मॉर्डन लव्ह – सीझन २
ही आठ भागांची ऍंथोलॉजी सिरीज याच नावाच्या प्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्स कॉलमने प्रेरित आहे. या सीझनमध्ये आठ नवीन असंबंधित कथा आहेत. ही सिरीज १३ ऑगस्ट रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीझ होणार आहे.

 

ब्रुकलिन नाइन-नाइन

‘द ब्रुकलिन नाइन नाइन’च्या बहुचर्चित आगामी सीझनमध्ये ऍंडी सॅमबर्ग, आंद्रे ब्रुगर, स्टेफनी बीट्रिझ हे कलाकार दिसतील. ही संपूर्ण सिरीज ९९ व्या कॅम्पसच्या आसपास घडलेल्या घटनांवर आधारित असेल. ही सिरीज १२ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रूबीना दिलैकच्या नवीन गाण्याला भरभरून प्रतिसाद; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले चाहत्यांचे आभार

-आनंदाची बातमी! अभिनेत्री नयनताराने केली साखरपुड्याची पुष्टी; जाणून घ्या कोण आहे तो नशीबवान?

-सोनू अभिनेत्रीसोबत करत होता ‘तुम तो ठहरे परदेसी’ गाण्यावर डान्स; मध्येच आला चाहता आणि…

हे देखील वाचा