Monday, July 1, 2024

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने मागितली आईची माफी; फोटो शेअर करत म्हणाला…

दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खानने आपली आई सुतापा सिकदर यांच्याकडे माफी मागितली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन बाबिलने आपल्या आईसाठी एक भावनिक संदेश लिहिला आहे. त्याने आईला सांगितले की, तूच आहेस जी माझी काळजी घेते. यासोबतच त्याने आईला वचन दिले की, तो नेहमीच त्यांची काळजी घेईल.

आई सुतापा सिकदर यांचा फोटो शेअर करत बाबिलने लिहिले की, “माझी प्रिय आई, मी खूपच मूडी आहे, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे. फक्त तूच माझी काळजी करतेस आणि असे कोणीही नाही ज्याला माझी काळजी असेल. आय लव्ह यू मम्मा. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुला दिलेल्या सर्व त्रासांसाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. मला तुझी नेहमीच काळजी घेत राहायची आहे.”

अलीकडेच इरफान खानचा मुलगा बाबिल खानने सांगितले होते की, त्याने त्याच्या पदार्पण प्रकल्पाचे पहिले वेळापत्रक पूर्ण आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटासंदर्भातील एक मेकिंग व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये बाबिल खानला पाहिले जाऊ शकते. अन्विता दत्त हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरीचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे, तर स्वस्तिका मुखर्जीही यात दिसणार आहे.

चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्मा करत आहे. नेटफ्लिक्स आणि अनुष्का शर्मा यांच्या कंपनीने एक छोटासा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात चित्रपटाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. बाबिल खान, तृप्ती डिमरी, इतर कलाकार आणि क्रू या व्हिडिओमध्ये दिसू शकतात. चित्रपट बर्फाळ ठिकाणी शूट केला गेला आहे.

अन्विता दत्त म्हणाल्या होत्या की, “ही एक कथा आहे, जी आई-मुलीच्या नात्यावर आधारित असेल. ‘क्वाला’ अत्यंत हृदयाला स्पर्श करणारी कथा असून, तिला तिच्या आईचे मन जिंकण्याची इच्छा आहे. मी खूप चांगल्या लोकांसोबत काम करत आहे. यात तृप्ती, बाबिल आणि स्वस्तिका यांचा समावेश आहे. अनुष्का शर्मा आणि नेटफ्लिक्ससोबत काम केल्याचा मला आनंद आहे. यापूर्वी मी ‘बुलबुल’ बनवला होता आणि आता मी ‘क्वाला’ बनवत आहे.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्विटरवर पार केला १ मिलियन फॉलोवर्सचा टप्पा; पण मेगास्टार चिरंजीवी स्वतः करत नाहीत कोणालाच फॉलो

-‘…आपण सामर्थ्यवान आहोत’, म्हणत मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने शेअर केला सुंदर फोटो; तुम्हीही कराल कौतुक

-काय सांगता! हॉलिवूडमध्ये जाण्यास राखी सावंत सज्ज, ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

-डीप नेक बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाच्या जीवघेण्या अदा! पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

हे देखील वाचा