Monday, September 25, 2023

ट्विटरवर पार केला 1 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा; पण मेगास्टार चिरंजीवी स्वतः करत नाहीत कोणालाच फॉलो

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे मेगास्टार चिरंजीवी यांनी आता ट्विटरवर 1 दशलक्ष फॉलोव्हर्सचा टप्पा पार केला आहे. ‘आचार्य’ फेम चिरंजीवी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने केवळ दक्षिणेतच नव्हे, तर देशभरात कोट्यवधी चाहते कमावले आहेत. त्यांनी काही हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच चिरंजीवींचे चित्रपट जेव्हा रिलीझ व्हायचे, तेव्हा प्रेक्षक मोठ्या संख्येने तिकिटासाठी धावपळ करत असत. असे म्हणतात की, त्यांच्यासाठी वेडे होत बऱ्याच लोकांनी आपला जीव देखील गमावला आहे.

त्यांची फॅन फॉलोविंग केवळ भारतपुरतीच मर्यादित नाही, तर परदेशातही त्यांच्या नावाचा गाजावाजा आहे. चिरंजीवी यांना सात वेळा दक्षिण भारतीय फिल्मफेअर पुरस्कार आणि चार वेळा नंदी पुरस्कार मिळाला आहे. त्याच प्रकारे ट्विटरवर 1 दशलक्ष फॉलोवर्स मिळवणे, ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यामध्ये एक मजेशीर गोष्ट म्हणजे, चिरंजीवींचे दशलक्ष फॉलोव्हर्स असूनही ते स्वतः कोणालाही फॉलो करत नाहीत.

चिरंजीवी आणि राम चरण यांचा ‘आचार्य’ हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. याचे एक मोठे कारण आहे चिरंजीवी आणि राम चरण, म्हणजेच बाप आणि लेकाची जोडी. या बाप- लेकाच्या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

राम चरण तब्बल 13 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे. पण या दोघांनी एकत्र काम करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. राम चरण एकदा म्हटला होता की, वडिलांसोबत चित्रपट करण्याचे त्याचे स्वप्न आहे, जे आता ‘आचार्य’ चित्रपटासोबत पूर्ण होत आहे. कोरटाला शिवा यांच्या दिग्दर्शिनाखाली तयार होत असलेला ‘आचार्य’ हा मोठ्या बजेटचा चित्रपट आहे. यात राम चरणसोबत अभिनेत्री काजल अगरवाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही नक्की वाचा-
एका वर्षांत 14 सुपरहिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिसवर केला धमाका, वाचा चिरंजीवीचा चित्रपटप्रवास
आता सुट्टी नाही! सलग दोन आठवडे बॉक्स ऑफिसवर ‘Gadar 2’चाच डंका, कमाईचा आकडा उडवेल तुमचीही झोप

हे देखील वाचा