Sunday, June 22, 2025
Home बॉलीवूड ‘फिल्मफेअरचे स्टेज मिस करत आहे’, म्हणत जान्हवी कपूरने शेअर केला पूल साईडचा डान्स व्हिडिओ, मैत्रिणीसोबत लावले जोरदार ठुमके

‘फिल्मफेअरचे स्टेज मिस करत आहे’, म्हणत जान्हवी कपूरने शेअर केला पूल साईडचा डान्स व्हिडिओ, मैत्रिणीसोबत लावले जोरदार ठुमके

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. जान्हवी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. अलीकडेच अभिनेत्रीने तिची फिटनेस ट्रेनर नम्रता पुरोहितसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यानंतर, आता तिने एक डान्स व्हिडिओही शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. युजर्सला हा व्हिडिओ खूपच पसंत पडल्याचे दिसून येत आहे.

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर, धमाकेदार स्टाईलमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पूलच्या बाजूला तिच्या मैत्रिणींसोबत नाचताना दिसत आहे. अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या ‘अप’ गाण्यावर तिचा मस्त डान्स पाहायला मिळाला. या व्हिडिओमध्ये जान्हवी आणि तिची मैत्रीण दोघींचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “मी फिल्मफेअरचे स्टेज मिस करत आहे, म्हणून आतासाठी पूलसाईडलाच.” हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही तासातच व्हिडिओला जवळपास 4 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले.

यापूर्वीही जान्हवी कपूरने तिच्या मित्र- मैत्रिणींसोबत जोरदार डान्स करतानाचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्येही जान्हवी तिच्या बर्‍याच मित्रमैत्रिणीसह धमाल करताना दिसली.

जान्हवी कपूरने तिच्या चित्रपट कारकिर्दीची सुरूवात, २०१८ साली ‘धडक’ या चित्रपटाद्वारे केली होती. तिचा दुसरा चित्रपट होता ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’. गेल्या महिन्यातच जान्हवीचा ‘रुही’ हा हॉरर- कॉमेडी चित्रपट रिलीझ झाला होता.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी ‘दोस्ताना २’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. करण जोहरच्या या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन दिसणार होता, पण आता तो या चित्रपटाचा भाग नाही. ‘दोस्ताना २’ याशिवाय अभिनेत्री बर्‍याच प्रकल्पांवर काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ

-शाहिद कपूरची पत्नी मीरा बनली छोटी मुलगी, आजकालच्या पोरा-पोरींना व्हिडीओतून दिलाय ‘हा’ संदेश

हे देखील वाचा