कमाल आर खान हा बॉलिवूड इंडस्ट्रीचा असा एक अभिनेता आहे जो आपल्या वक्ततव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो आपल्या सोशलम मीडियाद्वारे बॉलिवू़ड चित्रपटांना आणि अभिनेत्यांना ट्रोल करत असतो. यामुळे नेहमी वादविदामुळे त्यालाही ट्रोल केले जाते. काही दिवसापूर्वी त्याला एका महिेलेच्या दूरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आले होते. त्याला जामीन मिळाला होता पण, त्याच्या वादविवादामुळे त्याला सोडले नाही जाणुन घेउया पूर्ण माहिती.
कमाल आर खान(Kamaal R Khan) याला मुंबई कोर्टमध्ये मंगळवार ( दि.6 सप्टेंबर) रोजी फिल्म क्रिटिक आणि महिला दुरव्यवहार प्रकरणी जामिन मिळाला आहे. वर्सोवा पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी महिला छेडछाड प्रकरणी केआरकेवर गुन्हा दाखल केला हेता. यामुळे त्याला अटक केले होते, काही दिवसांनी त्याला जामिन मिळाला होता पण त्याच्यावर आधीच वादविद ट्विटमुळे खटला सुरुच आहे. त्याने 2020 मध्ये अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्यावर विवादास्पद ट्विट केले होते यावरही जमीन मिळवण्यासाठी बोरीवली कोर्टमध्ये कारवाही अजुनही सुरुच आहे.
केआरकेच्या विवादास्पद ट्विटमुळे त्याच्यावर झालेल्या गुन्ह्यावर बुधवार (7 सप्टेंबर ) दिवशी बोरीवली मेट्रोपोलिटन मजिस्ट्रेट कोर्टमध्ये सुनावनी होण्याची शक्यता आहे. केआरकेच्या अपमानकारक ट्विटमुळे त्याला 30 ऑगस्ट या दिवशी मुंबई अंतरराष्ट्रीय हवाई विमानतळावरुन अटक केले होते. यानंतर त्याला बोरीवली मेजिस्ट्रीट कोर्ट मध्ये आणले होतो. तिथे त्याला 14 दिवसाच्या कारावासमध्ये पाठवले होते.
महिला दुरव्यवहार प्रकरणी केआरकेला वर्सोवा सोलिसांनी रविवारी अटक केले होतो आणि बांद्रा कोर्टमध्ये हाजीर केले होते. केआरकेचा वकिल अशोक सरोगी आणि जय यादव यांनी बांद्रा मजिस्ट्रो कोर्टमध्ये जमीन कागदपत्रामध्ये असा दावा केला की, एफआईआरमध्ये लिहिलेल्या माहितीनुसार दुरव्यवहार प्रकरण याच्याशी व्यावहारीकरित्या काहीच संबंध जुळत नाही, त्याच्यावर चुकीची आरोप केल्याचा दावा केला.
कोर्टाने मंजूर केली केआरकेची याचिका
वकील जय यादव यांनी कोर्टामध्ये समक्ष सांगितले की, 18 महीन्यापूर्वच एफआईआर लिहिली होती आणि तीही पीडित मित्राच्या म्हनण्यावरुन. कोर्टाने सांगितले की, केआरकेच्या विरुद्ध भारतीय दंड कायदा जामीन याचिका मान्य करत आहे. कोर्टाने केआरकेच्या जामीनाला मन्यता दिली.
चुकीच्या प्रकारे हात लावल्याने केला होता आरोप
जून 2021 मध्ये 27 वर्षीय महिलाने केआरके विरोधात दुरव्यवहार प्रकरणी आईपीसी धारा 354 आणि 509 नुसार कंपलेट केली होती. पिडित महिलाने आरोप केला होता की, एका चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत असल्याने केआरकेने भेटण्यासाठी वर्सोवा (राहत्याघरी) बंगल्यामध्ये बोलावले होते. एफआईआर नुसार केआरकेने दारु पाजून तिला चुकीच्याप्रकारे स्पर्श केला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
उर्फी जावेदच्या मनात एक्स बॉय फ्रेंडबाबत अजूनही प्रेम? पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘मला तुझा अभिमान’
वडिलांच्या श्रीमंतीला लाथ मारून जेनिफर केंडलने केलेला शशी कपूर यांच्याशी पळून जाऊन विवाह
प्रियांका ‘मिस वर्ल्ड’ बनलेली, तेव्हा निकला मिशाही नव्हत्या फुटल्या; पाहा त्यावेळी कसा दिसायचा तिचा पती