Tuesday, February 10, 2026
Home बॉलीवूड केआरके पुन्हा एकदा मैदानात! करण जोहर आणि सैफ अली खानवर साधला निशाना

केआरके पुन्हा एकदा मैदानात! करण जोहर आणि सैफ अली खानवर साधला निशाना

अभिनेता कमाल आर खान (Kamal R Khan) हा नेहमी बॉलिवूड कलाकारंवर आपला निशाना साधत टिका करत असतो. तो नेहमी आपल्या वाजामुळे चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने अनेक अभिनेत्यांना आपल्या सोशल मीडियाद्वारे चित्रपटांवर  हल्ला केला आहे. काहि दिवसांपूर्वी त्याला अशा वर्तणुकीमुळे कारावासही भोगावा लागला होता. मात्र, चाहत्यांखातीर त्याने पुन्हा एकदा बॉलिवूड कलाकारांवर टिकास्त्र सोडले आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चित्रपट समिक्षक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता केआरके याने पुन्हा एकदा बॉलिवूडवर आपले टीकास्त्र सोडले आहे. हा अभिनेता आपल्या सोशल मीडियाद्वारे कलाकारांना ट्रोल करत असतो. त्याने काही दिवसांपूर्वीच एक वादग्रस्त ट्वीट लिहिले होते ज्यामुळे त्याला अटक केली होती. तो नेहमी असे वाद करत असतो त्यामुळे त्याची बेल देखिल फेटाळण्यात आली होती मात्र, काहि दिवसांपूर्वी त्याला सुटका मिळाली आहे. यानंतर त्याने चित्रपटाचे रिव्यू करण्यास बंद केले होते. त्यांनतर त्याने सोशल मीडियाद्वारे एक सर्वे केला, आणि मग पुन्हा एकदा तो रिव्यु करण्यास तयार झाला आहे.

सोशल मीडियाद्वारे कमाल आर खान याने ( दि. 6 ऑक्टोंबर ) या दिवशी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये लिहिले होते की, “अनेक लोक मला म्हणत आहेत की, टित्रपटाचे रिव्यु चालु ठेवा तर तुम्हीच ठरवा की, मी चित्रपटाचे रिव्यु केले पाहिजे की, नाही. कमेंटमध्ये हा किंवा नाही असे लिहा.” यांनतर त्याने शनिवारी (दि.7 ऑक्टोंबर) या दिवशी सर्वेचा एक फोटो शेअर करुन सांगितले की,” 2 मिलियन लोकांनी मला चित्रपटाचे रिव्यु करण्यास सांगितले आहे. जर मी हे बंद केले तर लाखो लोक नाराज होतील.”

त्याने लगेच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटावर टिका करत आपला रिव्यु शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ट्वीटमध्ये लिहिले होते की, “ब्रम्हास्त्र चित्रपटाने भारतामध्ये नेहमीसाठी 175 कोटीचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच दिग्दर्शकाला कमीत कमी 400 कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या इतिहासामध्ये आतापर्यतचा हा सर्वात फ्लॉप चित्रपट आहे. करण जोहरला असे रेकॉर्ड बणवण्यासाठी शुभेच्छा.”

केआरकेने सैफ अली खान याच्यावरही टिका करत लिहिले होते की, सैफ अली खान याने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “‘विक्रम वेधा’ चित्रपटाचे काही रिव्यु पाहून मी थक्क झालो होतो. आता हे आउटसाइडर आम्हाला शिकवणार की, चित्रपट कसा बणवायचा.” याचा अर्थ नवाब बॉलिवूडला आपली मालमत्ता समजत आहे का? आणि आउटसाइडरला कीडा.’

पाहायला गेलं तर कमाल आजपासून रिव्यु देण्याचे बोलत होता. मात्र, त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट पाहायला गेलं, तर त्याने सतत पोस्ट शेअर केलेल्या दिसून येत आहेत. त्याने आदिपुरुष चित्रपटावरही टीका करत लिहिले आहे की, हा पुरावा आहे की, भुषण कुमार याने 450 कोटी खर्च करण्याची चुकी केली आहे. रामायणला 3 तासात दाखवू शकत नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हुमा कुरेशी बनली लठ्ठ महिला! आगामी चित्रपटांचा घेऊ शकता ‘या’ दिवशी आनंद
अल्पवयीन मुलाच्या खांद्यावर सोपवली सलमानला उडवण्याची जबाबदारी, पोलिसांचा खळबळजनक खुलासा

हे देखील वाचा