Wednesday, April 15, 2026
Home बॉलीवूड रयान रेनॉल्ड्सने भारतीय चित्रपटांबाबत केलेल्या विधानावर भडकली कंगना; म्हणाली, ‘हॉलीवूड आमची स्क्रीन चोरत आहे’

रयान रेनॉल्ड्सने भारतीय चित्रपटांबाबत केलेल्या विधानावर भडकली कंगना; म्हणाली, ‘हॉलीवूड आमची स्क्रीन चोरत आहे’

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ‘थलायवी’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. दरम्यान, हॉलिवूडमध्ये बॉलिवूडचे अनुकरण करणारा कॅनेडियन अभिनेता रयान रेनॉल्ड्सच्या वक्तव्यावर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. रयान रेनॉल्ड्स अलीकडेच त्याच्या ‘फ्री गाय’ या चित्रपटाच्या प्रमोशन व्हिडिओमध्ये दिसला. ज्यामध्ये त्याने आपल्या भारतीय चाहत्यांना संबोधित केले. यामध्ये तो चाहत्यांना चित्रपटाच्या विविध घटकांबद्दल सांगत आहे. तो म्हणाला की, हा चित्रपट एक सामान्य बॉलीवूड चित्रपटासारखा दिसतो.

रयान रेनॉल्ड्स व्हिडिओमध्ये म्हणतो की, “जर तुम्ही विचार करत असाल की, हॉलिवूड बॉलिवूडची कॉपी करत आहे… ठीक आहे, याचे उत्तर हो आहे. आम्हाला यात काही लाज नाही वाटत, यात लाज वाटण्यासारखे काही नाही.” कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया देत रयानचे विधान शेअर केले आहे. व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले, “…आणि आमची स्क्रीन चोरण्याचा प्रयत्न करत आहे.” (bollywood kangana ranaut reacts on ryan reynolds statement on hollywood copy from bollywood )

कंगनाने अलीकडेच हॉलिवूड चित्रपटांनी भारतीय चित्रपटांवर परिणाम केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. माध्यमातील वृत्तानुसार, कंगनाने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, “आपल्याला अमेरिकन आणि इंग्रजी चित्रपटावरचा भर कमी करणे आवश्यक आहे, कारण ते आपल्या पडद्यावर कब्जा करत आहेत. आपल्याला एक राष्ट्राप्रमाणे वागण्याची गरज आहे. आपल्याला उत्तर भारत किंवा दक्षिण भारतासारखे विभाजन करणे थांबवावे लागेल. आपण आधी आपल्या स्वतःच्या चित्रपटांचा आनंद घ्यायला हवा. मग तो मल्याळम, तामिळ, तेलुगु किंवा पंजाबी असो.”

अलिकडेच कंगनाचा ‘थलायवी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आगामी काळात अभिनेत्री ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बोले तो एकदम कडक!’ अरशद वारसीचे ‘बॉडी ट्रान्सफॉर्मेशन’ पाहून थेट जॉन सीनाशी केली जातेय तुलना

-‘बिग बॉस १५’साठी सलमान खान घेतोय ‘इतकी’ रक्कम; कोटीच्या मानधनामुळे अभिनेता आला ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-भारीच ना! निशांत अन् शमिताला धूळ चाखवत दिव्या ठरली ‘बिग बॉस ओटीटी’ची उपविजेती

हे देखील वाचा