अभिनेत्री कंगना रणौत कायमच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. अशात तिने आता नागा चैतन्य आणि समंथाच्या घटस्फोटात उडी घेतली आहे. तिने या दोघांच्या घटस्फोटावर टीका करत एक मोठी पोस्ट लिहिली आणि इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केली आहे.
तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “जेव्हा पण घटस्फोट होतो तेव्हा चूक ही नेहमी पुरुषांची असते. माझं हे मत तुम्हाला चुकीचं किंवा तुलनात्मक वाटू शकतं. पण देवाने आपल्याला असंच बनवलं आहे. महिलांना कपड्यांसारखं बदलणं बंद करा. त्यांच्या बरोबर असं वागतात आणि नंतर सगळं काही मिळाल्यावर त्यांना स्वतःची चांगली मैत्रीण म्हणवतात. हे खूप वाईट आहे. कधी तरी चुकून शंभरातली एक महिला चुकते, सगळ्याच नाही.” पुढे तिने नागा चैतन्यवर निशाणा साधत लिहिले की, “नागा चैतन्यचा घटस्फोट हा ‘घटस्फोट एक्स्पर्ट’ आमिर खानच्या संगतीत राहून झाला आहे.” (Bollywood Kangana Ranaut target Aamir Khan on Samantha and Naga divorce)

काही चाहत्यांना देखील तिने खडे बोल सुनावले आहेत. तिने पुढे लिहिले आहे की, “धिक्कार आहे अशा लोकांवर ज्यांना मीडिया आणि चाहत्यांकडून प्रोत्साहन मिळते. काही चाहते अशा लोकांचा जयजयकार करतात आणि महिलांची तुलना करतात. घटस्फोटाचे प्रमाण आधीपेक्षा आता जास्त वाढले आहे.”
https://www.instagram.com/p/CUhawZvrPK9/?utm_source=ig_web_copy_link
शनिवारी नागा चैतन्य आणि समंथाने एक पोस्ट शेअर करत सर्व चाहत्यांना त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “आमच्या शुभचिंतकांना आम्ही सांगू इच्छितो की, खूप विचार केल्यानंतर आम्ही दोघांनी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्ही सुखी आहोत. आम्ही दोघांनी एक दशक एकत्र मैत्री टिकवली आणि एकमेकांबरोबर राहिलो. आम्हाला असे वाटते की, आमची मैत्री इथून पुढे देखील अशीच खास राहील. आम्ही आमच्या चाहत्यांना पत्रकारांना आणि शुभचिंतकांना सांगू इच्छितो की, आम्हाला शांत राहण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी थोडा एकांत मिळू द्या.”
नागा चैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा त्याचा आगामी चित्रपट आहे. यामध्ये आमिर खान प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप
-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक
-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ