Sunday, December 3, 2023

‘थोडी सी जो पी ली है’, आमिरच्या गेट टुगेदर पार्टीत कपिलच्या गायकिने वेधले सर्वांच लक्ष, व्हिडिओ व्हायरल

गेल्या आठवड्यात आमिर खानकॅरी ऑन जट्टा 3‘ या पंजाबी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चमध्ये सामील झाला होता. यावेळी त्याच्यासोबत कॉमेडियन कपिल शर्माही दिसला. ट्रेलर लाँच झाल्यानंतर, ‘कॅरी ऑन जट्टा 3’ ची संपूर्ण टीम आमिर खानच्या पार्टीत सहभागी झाली होती, ज्याचा एक व्हिडिओ अर्चना पूरण सिंगने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

आमिर खान (aamir khan) याच्या घरी मित्रांची मैफील जमली हाेती, ज्यामध्ये कपिल शर्मा त्याच्या संपूर्ण टीमसोबत पाेहचला होता. आमिर खानच्या घरी झालेल्या या पार्टीत अर्चना पूरण सिंग देखील उपस्थित होती. अर्चनाने तिच्या इंस्टाग्रामवर या पार्टीचा एक इनसाइड व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना अर्चना पूरण सिंगने लिहिले, “राजा हिंदुस्तानीच्या आमिरला वर्षांनंतर भेटलो. प्रेमळ गाेष्टी आणि वर्षांपूर्वीचे अनेक किस्से.. आमिरच्या घरी या छान संध्याकाळसाठी मनापासून धन्यवाद. तुम्ही आता अधिक मजेदार झाला आहात.. खुप सारे प्रेम आणि गंमत जंमत. त्या रात्री चर्चा आणि मजेदार किस्से ऐकताना खूप मजा आली. ‘हंगामा है क्यूं बरपा..’ हे सर्वांचे आवडते गाणे गायल्याबद्दल कपिल शर्माचे आभार. मात्र, तुमच्या हातात जे आहे ते फक्त लिंबूपाणी आहे.”

या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा ‘हंगामा है क्यूं बरपा, थोडी सी जो पी ली है’ गाताना दिसत आहे. यादरम्यान कपिलसाेबत त्याचा मित्र आणि त्याच्या शोचे संगीतकार दिनेश, कपिलची पत्नी गिनी चतरथ, कॉमेडियन किकू शारदा, अभिनेत्री कविता कौशिक, सोनम बाजवा, आमिर खान, गिप्पी ग्रेवाल या सारखे अनेक स्टार्स या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.(bollywood kapil sharma sings thodi si jo peeli hai at aamir khan home)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“आम्ही विनोदवीर नाही”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचे मोठे वक्तव्य, म्हणाला…

इलियानाने प्रेग्नेंसीदरम्यान बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर लावली आग, एकदा पाहाच फाेटाे

हे देखील वाचा