Monday, June 17, 2024

‘घरातील ‘या’ व्यक्तीसाठी आयपीएलमध्ये जागा मिळेल का?’ पाहा करीना कुणासाठी करतेय विनंती

मुंबई| बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर आजकाल तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर खूप अ‍ॅक्टिव असते, ती नेहमीच रंजक पोस्ट्स शेअर करते. करीनाच्या बर्‍याच पोस्ट्स ‘छोटा नवाब’ अर्थात तिचा मुलगा तैमूर अली खानशी संबंधित असतात. करिनाने नुकत्याच टाकलेल्या एका पोस्टचीही बरीच चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये करिना तैमूरसाठी आयपीएलमधील एखाद्या संघात जागा शोधत आहे. तिने तैमूरचा एक अतिशय रंजक फोटोही शेअर केला आहे.

वास्तविक, करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तैमूरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तैमूर हातात एक मोठी बॅट घेऊन क्रिकेट खेळताना दिसत आहे. या फोटोत तो खूप गोंडस दिसत आहे. त्याचवेळी तैमूरच्या मागे स्टंपसही पाहायला मिळतात.

हा फोटो जितका मनोरंजक आहे करीनाने दिलेले शीर्षकही तितकेच मनोरंजक आहे. करिनाने या फोटोसह लिहिले- ‘आयपीएलमध्ये संघात जागा आहे का? मीही खेळू शकतो ‘. करीनाने ही विनंती तैमुरसाठी केली आहे. करीना कपूरने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. तैमूरचा हा गोंडस फोटो लोकांची मने जिंकत आहे, म्हणूनच या पोस्टवर जबरदस्त प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CGSPFYAFmU9/

करीना कपूरच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही तैमूरच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये बॉलीवूडमधील गर्ल गँगचा समावेश आहे. अमृता अरोरा आणि करिश्मा कपूर यांनी हार्ट इमोजी शेयर करून तैमूरबद्दल प्रेम व्यक्त केल आहे.

हे देखील वाचा