बॉलिवूडच्या सेलिब्रिटी जोडप्यांना आपण जेव्हा पाहतो तेव्हा नेहमी आपण विचार करतो की ही तर श्रीमंत मंडळी…यांना कशाची कमी आहे? अगदी ऐशो आरामात जगतात. परंतु जरा थांबा! चढ-उतार या नाण्याच्या दोन बाजू प्रत्येकाच्या आयुष्यात असतात मग तो सामान्य माणूस असो वा सेलिब्रिटी, प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट काळ येतच राहतात. परंतु या वेळी जे स्वतःला मानसिकरित्या शांत ठेवतात आणि विचार करून निर्णय घेतात, ते कायम यशस्वी होतात. बॉलिवूडमध्ये बर्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी सामान्य मुलींप्रमाणे स्वतःचा संसार थाटला पण त्यांचं आयुष्य बदललं आणि काही कारणास्तव त्यांना घटस्फोट घ्यावा लागला. आज या अभिनेत्री कदाचित एकट्या राहत असतील पण धैर्याने त्या त्यांचे सुखी आयुष्य जगत आहेत. अशाच पाच अभिनेत्रींची आज आपण ओळख करुन घेणार आहोत.
१. करिश्मा कपूर
या यादीतील पहिलं नाव करिश्मा कपूर आहे. करिश्मा कपूर कुटुंबातील ज्येष्ठ कन्या! जिने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. हिची चित्रपट कारकीर्द उत्कृष्ट होती. आपल्या कारकीर्दीच्या उंचीवर, करिष्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. या विवाहातून करिश्माला दोन मुले देखील झाली. परंतु २०१६ मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आणि ते वेगळे झाले. तरीसुद्धा करिश्माने हार मानली नाही आणि तिचे सर्व लक्ष तिच्या मुलांवर केंद्रित केले. मुलं मोठी झाल्यावर पुन्हा एकदा ती रुपेरी पडद्याकडे वळू पाहतेय. २०२० च्या सुरुवातीला तीची ‘मेंटलहुड’ वेब सीरिज ओटीटी वर प्रदर्शित झाली.
२. मलायका अरोरा
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा हिने अरबाज खानशी लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांपर्यंत सर्व काही व्यवस्थित चाललं होतं, परंतु नंतर दोघांमधील वाद वाढू लागले आणि यानंतर अरबाज आणि मलायका यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या दहा वर्षानंतर दोघे विभक्त झाले. मलायका आणि अरबाज यांचा मुलगा असून तो सध्या आपल्या आईबरोबर राहतो. घटस्फोटानंतर मलायका अजिबात खचली नाही. सध्या ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.
३. संगीता बिजलानी
एकेकाळी संगीता बिजलानी हिचं नाव सलमान खानशी खूप जोडलं गेलं होतं. पण तिने क्रिकेटर अजरुद्दीनशी लग्न करून सगळ्यांना धक्का दिला. संगीता आणि अझरुद्दीन यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि २०१० मध्ये दोघांनीही घटस्फोट घेतला. आज संगीता एकटीच सुखी आयुष्य जगत आहे. हल्ली कधीकधी ती सलमानबरोबर पुन्हा दिसू लागली आहे.
४. महिमा चौधरी
शाहरुख खानच्या ‘परदेस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री महिमा चौधरी आता चित्रपटांमधून गायब झाली आहे. 2006 मध्ये तिने बॉबी मुखर्जीशी लग्न केलं होतं. महिमाचं लग्न फक्त सात वर्षे टिकलं आणि दोघेही घटस्फोट घेऊन वेगळे झाले. महिमाला एक मुलगा आहे, ज्याचा ती एकट्याने सांभाळ करतेय. ती सिनेमांमध्ये दिसत नसली तरी तिला बर्याचदा मोठ्या कार्यक्रमांमध्ये पाहिलं जातं.
५. मनीषा कोईराला
नव्वदीच्या दशकातली सुपरहिट अभिनेत्री मनीषा कोईराला हिने बिझनेसमन सम्राट दहलशी लग्न केलं. परंतु, काही दिवसांनंतर त्यांचे परस्परांतील संबंध बिघडू लागले. लग्नाच्या अवघ्या दोन वर्षानंतर मनीषा आणि सम्राट यांचा घटस्फोट झाला. काही काळ फिल्मी पडद्यापासून दूर राहिल्यानंतर मनीषाने पुन्हा कमबॅक केले. २०१८ मध्ये संजू सिनेमातून तिने कमबॅक केलं. गेल्या वर्षी ती ‘प्रस्थनाम’ या चित्रपटात दिसली होती. यंदा तीची ‘मस्का’ वेब सीरिज रिलीज झाली.
बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींचे घटस्फोट झाले आणि त्यांनी त्यानंतर पुन्हा लग्न देखील केलं परंतु या पाच जणींना मानलं पाहिजे राव! यांनी दाखवून दिलं की कुणाचंही कुणावाचून अडत नाही. हिंमत असेल तर साथीदाराविनाही जगता येतं आणि संसारही करता येतो.
वाचनीय लेख-
-पती सोबतचे नाते संपल्यावरही बॉलीवूड सारख्या मायाजाळात खंबीरपणे उभ्या राहिल्या या ५ अभिनेत्र्या
-बॉलिवूड अभिनेत्रींचा अजब कारभार! विवाहित पुरुषांसोबत बांधली लगीन गाठ