Thursday, May 2, 2024

‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

बाॅलिवूडची ‘बार्बी डॉल’ म्हणुन ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे कॅटरिना कैफ होय. कॅटरिनाने तिच्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. तिने चित्रपटसृष्टीला एकपेक्षा एक चित्रपट दिले आहे. कॅटरिनाचे चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुकत असतात. कॅटरिनाचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ची घोषणा झाल्यानंतर कॅटरिनाचा नवा अवतार पाहण्यासाठी चाहते डोळे लावून बसले आहेत. अभिनेत्री अलीकडेच ‘टायगर ३’ चित्रपटाच्या शूटींगसाठी रशियाला रवाना झाली आहे.

‘टायगर ३’ चित्रपटाचे सर्व भाग वेगवेगळ्या देशांमध्ये शूट केले जाणार आहेत. बॉलिवूडची लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी म्हणजे सलमान खान आणि कॅटरिना कैफ. ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. यशराज प्रोडक्शन निर्मित ‘टायगर’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात देखील हे एकत्र काम करताना दिसतील. काही दिवसांपुर्वीच ‘टायगर ३’चे शूटिंग सुरू झाले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, कॅटरिना शूटींगसाठी ४५ दिवसांसाठी रशियाला रवाना झाली आहे. या शूटिंगमध्ये ती कधीही न पाहिलेले स्टंट सीन शूट करणार आहे. यासाठी ती गेल्या काही महिन्यांपासून प्रशिक्षण घेत आहे. ती ‘टायगर’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात सलमान खानसोबत अभिनय करताना दिसणार आहे. या शिवाय कॅटरिना फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

कॅटरिना रशियातील ‘टायगर ३’ चे शूटींग संपवून लवकर तुर्की आणि ऑस्ट्रियामध्ये शूटींगसाठी रवाना होणार असल्याची माहिती काही माध्यमांतील वृत्तानुसार मिळाली आहे. अभिनेता सलमान खान चित्रपटात त्याच्या रुबाबदार अंदाजात दिसणार आहे. तर कॅटरिना झोयाच्या भूमिकेत तिच्या लढाऊ सीनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, इम्रान हाश्मी ‘टायगर ३’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तो सलमानच्या विरोधात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या लूकमध्ये येण्यासाठी इम्रान जिममध्ये खूप घाम गाळत आहे. तो पहिल्यांदाच सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा