Friday, November 22, 2024
Home नक्की वाचा Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव

Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव

आपल्या समाजात कोणाच्याही नावासमोर वडिलांचे नाव नसेल, तर लोकांना काय बोलावे तेच कळत नाही. प्रथा म्हणा किंवा काहीही असो, प्रत्येक व्यक्ती आपल्या नावापुढे वडिलांचे नाव लावते हे सर्वश्रुत आहे आणि समाजानुसार ते आवश्यकही मानले जाते. याचप्रमाणे, मुलगी लग्नापूर्वी वडिलांचे आडनाव धारण करते आणि लग्नानंतर तिचे आडनाव पतीच्या आडनावाने बदलले जाते. ही प्रथा शतकानुशतके चालू आहे. ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईचे नाव आपण क्वचितच समाविष्ट करतो. सध्या, आज आपण अशा बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल बोलू ज्यांनी ही प्रथा मोडत, नावासमोर आईचे आडनाव किंवा नाव लिहितात. कोणते आहेत ते कलाकार चला जाणून घेऊ.

मल्लिका शेरावत (Mallika Sherawat)
बॉलिवूडमधील बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक मल्लिका शेरावत देखील तिच्या नावासमोर तिच्या आईचे आडनाव वापरते. मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे. लांबा हे तिच्या वडिलांचे आडनाव आहे, तिच्या आईचे नाव संतोष शेरावत आहे. मल्लिका नेहमीच तिच्या आईचे आडनाव वापरत असते.

कोंकणा सेन शर्मा (Konkana Sen Sharma)
कोंकणा सेन शर्मा ही अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या नावासमोर आईचे आणि वडिलांचे दोघांचेही आडनाव लावते. अभिनेत्री कोंकणा सेनच्या वडिलांचे नाव मुकुल शर्मा, तर आईचे नाव अपर्णा सेन आहे. अभिनेत्री तिच्या नावासमोर आई आणि वडील दोघांची आडनावे लावते. त्यामुळे ती तिचे पूर्ण नाव कोंकणा सेन शर्मा असे लिहिते.

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari)
अभिनेत्री अदिती राव हैदरी ही देखील अशा बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे, जी तिच्या वडिलांचे आणि आईचे आडनाव वापरतात. तिने तिच्या आईचे आडनाव राव आणि वडिलांचे आडनाव हैदरी होते आणि त्यामुळे तिचे पूर्ण नाव अदिती राव हैदरी आहे.

सायरा बानू (Saira Banu)
दिलीप कुमार यांची पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू देखील त्यांच्या नावासमोर त्यांच्या आईचे आडनाव लावतात, वडिलांचे किंवा पतीचे नाही. सायराच्या वडिलांचे नाव मियां एहसान-उल-हक आणि आईचे नाव नसीमा बानू होते. ज्या काळात पितृसत्ताक कुटुंबे होती, त्या काळात सायराने आपल्या नावापुढे आईचे नाव लावून समाजाला एक वेगळाच संदेश दिला.(bollywood konkona sen sharma aditi rao hydari to sanjay leela bhansali bollywood celebs who use mother surname and name)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल तर सीबीआयकडून त्याच्याघरी छापेमारी
‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’ मालिकेच्या सेटला आग, याच ठिकाणी झाला होता अभिनेत्री तुनिशा शर्माचा मृत्यू

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा