Friday, April 19, 2024

‘आम्ही दोघं सोबत होतो मात्र…’, म्हणत सायरा बानो यांनी व्यक्त केले दिलीप कुमार यांच्या निधनाचे दुःख

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी मागच्यावर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात दुःखाची लाट आली होती. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे त्यांच्या फॅन्ससोबतच संपूर्ण बॉलिवूडदेखील अजून बाहेर येऊ शकले नाही. मात्र दिलीप कुमार यांच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का बसला आहे त्यांची पत्नी असलेल्या सायरा बानो यांना. दिलीप कुमार यांना जाणून काही महिने उलटले असले तरी त्या अजून या धक्क्यातून बाहेर येऊ शकल्या नाही. रिपोर्ट्सनुसार त्या कोणालाही भेटत नाही. त्यांनी कबूल केले आहे की, त्या अजूनही या दुःखातून बाहेर येऊ शकल्या नाही.

नुकतेच सायरा बानो यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी खूपच जास्त दुखी आहे. मी या दुःखातून कसे बाहेर येऊ शकते? मी हे नाही करू शकत. मी माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट खूपच आनंदाने उत्साहाने करत होती. सर्व काही चांगले होते, आम्ही दोघं सोबत होतो. मला दिलीप कुमार यांच्यासोबत घरात राहायला खूप आवडायचे. मला बाहेर जायला आणि पार्टी करायला अजिबातच आवडले नाही. आता अशी वेळ आहे की मला बाहेर जायचे नाही. कदाचित जोपर्यंत मी यातून बाहेर येत नाही तोपर्यंत. मला कायम दिलीप साहेब माझ्या आयुष्यात हवे होते.”

सायरा बानो पुढे म्हणाल्या की, “सध्या मी स्वतःला मेडिटेशन आणि प्रार्थनामध्ये व्यस्त ठेवते. हो सध्या मी लोकांना भेटत नाही जे खास आहे त्यांना भेटत आहे. मात्र मी स्वतःला खूपच भाग्यवान समजते, की लोकांना माझी काळजी आहे. मला माहित आहे की, अनेक लोक अशा परिस्थितून बाहेर येतात. मात्र माझे आणि दिलीप साहेबांचे नाते खूपच घट्ट होते. ते खूपच वेगळे व्यक्तिमत्व होते.”

दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो यांची तब्येत बिघडली होती. हाय ब्लड प्रेशर, श्वास घ्यायला त्रास आणि हाय शुगर यांमुळे त्यांना हिंदुजा रुग्णालयात भरती कऱण्यात आले होते. दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी ११ ऑक्टोबर १९६६ साली लग्न केले. त्यावेळी दिलीप साहेब ४४ वर्षांचे होते. तर सायरा बानो २२ वर्षांच्या होत्या. त्या दोघांमध्ये २२ वर्षांचे अंतर असूनही अतिशय प्रेम होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा