Tuesday, July 9, 2024

‘मिस युनिव्हर्स’ ते ‘मिसेस भूपती’ बनण्यापर्यंत ‘असा’ होता लारा दत्ताचा प्रवास, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दलच्या रंजक गोष्टी

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावावर केला आहे. यातीलच एक अभिनेत्री म्हणजे लारा दत्ता. लाराने आपला सहजसुंदर अभिनयाने आपल्या चाहत्यांना अगदी भारावून सोडले आहे. तिने एकापेक्षा एक असे चित्रपट दिले आहेत. भूमिका कोणतीही असो तिने नेहमीच आपले सर्वोत्तम दिले आहे. तिने शुक्रवारी (१६ एप्रिल) आपला ४३ वा वाढदिवस साजरा केला. तिच्या वाढदिवसानिमित्त आपण तिच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया…

लाराचा जन्म उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे झाला होता. लारा हिंदी, पंजाबी, कन्नड, फ्रेंच या भाषेत तरबेज आहे. लारा दत्ताचे वडील पंजाबी आणि आई एँग्लो इंडियन आहे. सन २००० मध्ये मिस युनिव्हर्सचे विजेतेपद पटकावत सर्वांना आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडले होते. तिने केवळ देशाचे नाव मोठे केले नाही, तर बॉलिवूडमध्येही यशस्वी करिअर केले. ती आता चित्रपटांमध्ये कमी दिसत असली, तरीही तिने चित्रपट कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपट केले.

लाराने सन २००३ मध्ये तिने ‘अंदाज’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा पदार्पण पुरस्कार मिळाला होता. लाराने ‘मस्ती’, ‘नो एंट्री’, ‘भागम भाग’, ‘हाऊसफुल’, ‘चलो दिल्ली’ यांसारखे अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिची मॉडेलिंग कारकीर्द चित्रपटांपेक्षा अधिक चांगली मानली जाते.

चित्रपट कारकिर्दीसोबतच लारा तिच्या अफेअर्ससाठीही चर्चेत होती. तिचे नाव केली डोर्जी, डिनो मोरेया यांच्याशी जोडले गेले होते. पण लारा दत्ताचे मन कालांतराने टेनिसपटू महेश भूपती याच्याशी जोडायला लागले. त्यावेळी महेश भूपती याचा अजून घटस्फोट झालेला नव्हता. त्यानंतर त्याने त्याचे पहिले लग्न मोडत लारा दत्ताशी २०११ मध्ये लग्न केले.

जेव्हा महेश आणि लारा भेटले होते, तेव्हा तिला महेशचा साधेपणा फार आवडला. दोघांनाही मुलगी सायरा आहे. लारा अनेकदा आपल्या मुलीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करते, जे चाहत्यांना खूप आवडतात.

लग्नानंतर लारा हळूहळू चित्रपटांपासून दूर गेली. परंतु लारा काही काळापूर्वी ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिच्या गरोदरपणात, लाराने अनेक योगा व्हिडिओ तयार केले होते, जे सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय झाले होते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिची फोटोही चाहत्यांना आवडत असतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोपा नव्हता मनोज वाजपेयी यांचा चित्रपट प्रवास, वडिलांना शेतात करायचे मदत, बिग बींचा ‘हा’ चित्रपट पाहून धरली अभिनयाची वाट

-एव्हरग्रीन ‘शोले’ चित्रपट निर्मितीची कहाणी आहे खूपच रंजक, ‘अशाप्रकारे’ अमजद खान बनले होते ‘गब्बर’

-दिवंगत अभिनेते राजकुमार यांनी थेट तोंडावर केला ‘या’ कलाकारांचा अपमान, गोविंदाचा शर्टच बनवला होता रुमाल

हे देखील वाचा