Monday, February 24, 2025
Home टेलिव्हिजन दिसायला अगदी सेम टू सेम अनुपम खेर यांचे मोठे बंधू राजू; टीव्ही-मालिकांमध्ये केले काम, परंतु…

दिसायला अगदी सेम टू सेम अनुपम खेर यांचे मोठे बंधू राजू; टीव्ही-मालिकांमध्ये केले काम, परंतु…

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपूर बंधूंबद्दल तुम्हाला माहिती असेलच. यासाेबतच सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान यांनाही स्क्रिन शेअर करताना तुम्ही पाहिलं असेल, पण आज आम्ही तुम्हाला एक अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, जे त्याच्या भावाची कॉपी दिसतात. ते म्हणजे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांचा भाऊ राजू खेर. राजू खेरे यांनी रुपेरी पडद्यावर आणि छाेट्या पडद्यावर या दोन्ही ठिकाणी काम केले. मात्र, त्यांना त्याच्या भावाइतकी प्रसिद्धी मिळवता आली नाही.

नशिबापेक्षा जास्त कोणालाच मिळत नाही असे म्हणतात. अनुपम खेर (anupam kher) यांचा भाऊ राजू खेर (raju kher) यांच्यासोबतही असेच काहीसे घडले. चित्रपटांमध्ये काम केले, टीव्हीकडेही वळले, पण लाख प्रयत्न करूनही त्यांना प्रसिद्धी मिळवता आली नाही.

दिसायला अनुपम खेरसारखे दिसणारे राजू खेर यांनी चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी टीव्ही इंडस्ट्रीत छाप पाडली होती. त्यांनी ‘जाने भी दो यारो’, ‘तेरे घर के सामने’, ‘कुलदीपक’ आणि ‘अभी तो मैं जवान हूं’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 1998 मध्ये राजू खेर यांनी ‘गुलाम’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले हाेते. ज्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिली, ज्यामध्ये ‘शूट आउट अॅट वडाळा’, ‘दिल्ली बेली’, ‘जंगल’, ‘सैलाब’, ‘उमेद’, ‘ओम जय जगदीश’, ‘ब्लॅक होम’, ‘मैं तेरा हिरो’, ‘बरदश्त’ या चित्रपटांचा समावेश आहे. राजू यांनी अनेक चित्रपटात संस्मरणीय भूमिका केल्या आहेत. मात्र, या भूमिकांनंतरही त्यांना भावासारखी प्रसिद्धी मिळाली नाही.

राजू खेर यांनी केवळ अभिनयच नाही, तर दिग्दर्शनही केले आहे. 2010 मध्ये त्यांनी ‘अभिलाषा’ हा टीव्ही शो दिग्दर्शित केला. एवढेच नाही, तर त्यांनी या मालिकेचे संवादही लिहिले आहेत. त्याच्या दिग्दर्शनाचे इंडस्ट्रीत खूप कौतुक झाले. राजू खेर यांना त्यांच्या भावासाराखे यश मिळाले नसले, तरी त्यांनी त्यांच्या अत्यंत साधेपणाने बाॅलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.(bollywood latest news who is anupam kher elder brother raju kher look like his carbon copy work in film and tv but not get fame )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज पाकिस्तानी कलाकार कवी खान यांचे कॅन्सरमुळे दुःखद निधन

उफ्फ! रुबीना दिलैकचा ग्लॅमरस अंदाज, पाहणऱ्याचीही उडेल झाेप

हे देखील वाचा