दबंग खान सलमानचा भाऊ असूनही सोहेल खान करावं लागलं होतं पळून जाऊन लग्न? कारण वाचून…


‘मैने दिल तुझको दिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सोहेल खान आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. २० डिसेंबर १९७० मध्ये सोहेलचा मुंबईत जन्म झाला. बॉलिवूडच्या दबंग खानचा म्हणजेच सलमान खानचा सोहेल हा लहान भाऊ.

खान कुटुंब म्हणजे बॉलिवूडमधील मोठे प्रस्थ. असे असूनही सोहेलला अभिनयात पाहिजे तितके यश मिळवता आले नाही. अभिनयात अपयशी झालेल्या सोहेलला चित्रपटांच्या निर्मितीत आणि दिग्दर्शनात चांगले यश मिळाले. सोहेलच्या प्रोफेशनल जीवनाइतकेच वैयक्तिक जीवनही खास आहे. सोहेलची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे.

सोहेलने सीमा सचदेव सोबत लग्न केले. सोहेल आणि सीमा यांची पहिली भेट मुंबईत झाली. मूळची दिल्लीची असलेली सीमा फॅशन डिझायनर होण्यासाठी मुंबईत आली. तेव्हा तिची आणि सोहेलची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांच्या भेटी वाढत गेल्या. आधी मैत्री, मग प्रेम असे काहीसे या दोघांच्या बाबतीत झाले. एकमेकांच्या आकंठ प्रेमात असलेल्या या दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचे होते, मात्र सीमाच्या घरच्यांना हे नाते मान्य नव्हते. तेव्हा १९९८ साली प्रदर्शित झालेल्या सोहेलच्या पहिल्याच दिग्दर्शित ‘प्यार लिया तो डरना क्या’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी या दोघांनी पळून जाऊन आर्य मंदिरात लग्न केले. शिवाय दोघांनी मुस्लिम रीतीने देखील निकाह केला. त्यानंतर मग सीमाच्या घरच्यांनी हे नाते मान्य केले.

लग्नाच्या काही दिवसांनी सोहेल आणि सीमाने एंटरटेनमेंट बिझनेस सुरु केला. हळू हळू सीमा बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर म्हणून ओळखली जाऊ लागली. सीमाचे ‘बांद्रा १९०’ नावाचे एक बुटीक असून हे बुटीक ती, सुजैन खान आणि महीप कपूर मिळून चालवतात. शिवाय सीमाचे मुंबईमध्ये अनेक स्पा असून, कलिस्ता नावाचे सलून देखील आहे. सीमाने टीव्हीवर ‘जस्सी जैसी कोई नहीं’ मालिकेसाठी वेशभूषा केली होती. या मालिकेनेच सीमाला ओळख मिळवून दिली. आज सीमा एक मोठी फॅशन डिझायनर म्हणून सर्वत्र ओळखली जाते. सोहेल आणि सीमाला निर्वाण आणि योहान नावाची दोन मुले आहेत.


Leave A Reply

Your email address will not be published.