Saturday, June 29, 2024

संपतच नाही! बॉलीवूडमधील ‘या’ गाण्यांची लांबी आहे सर्वात जास्त, ‘संदेसे आते है’ सह या गाण्यांचा आहे समावेश

असे म्हणतात की, एका चांगल्या चित्रपटात सर्व काही चांगले असले पाहिजे, तरच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला काम करेल. भारतीय चित्रपटांमध्ये कथेवर जितके कठोर परिश्रम घेतात, तितकेच गाण्यावर आणि संगीतावरही कठोर परिश्रम घेतले जातात. तुम्ही बॉलिवूडमध्ये असे बरेच चित्रपट पाहिले असतील, जे फक्त गाण्यांमुळे हिट ठरले आणि काही असेही आहेत जे फ्लॉप होऊनही त्यांचे गाणे हिट ठरले. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये फक्त गाण्यांद्वारेच चित्रपटांची कथा लक्षात येत असे.

भारतीय चित्रपटांमध्ये गाण्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. आपल्या संगीतकारांनी देखील गाण्यांमध्ये अनेक विक्रम नोंदवले आहेत. अगदी सांगायचं झालं तर गाण्याची लांबी. बॉलीवूडमध्ये अशी अनेक गाणी आहेत, ज्यांची लांबी अगदी १४ मिनीटांच्या वर आहे. चला तर मंडळी आज आपण अशाच गाण्यांबद्दल जाणून घेऊयात.

अब तुम्हारे हवाले वतन साथियो-
साल २००४ मध्ये रिलीझ झालेल्या ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’ या चित्रपटाचे शीर्षक गीत १४ मिनिटे २९ सेकंदाचे होते. हे बॉलिवूडमधील सर्वात लांब गाणे मानले जाते. हे गाणे समीर यांनी लिहिले होते, तर अनु मलिक यांनी गाण्याला संगीत दिले. सोनू निगम आणि उदित नारायण यांनी त्यांच्या उत्कृष्ट आवाजाने हे गाणे सजवले होते. गाण्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आणि सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर गीतांमध्ये याचा समावेशही झाला.

हम साथ साथ हैं-
‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटातील ‘सुनो जी दुल्हन, एक बात सुनो जी’ हेदेखील दीर्घ गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहे. १२ मिनिट ११ सेकंदांच्या या राजश्री प्रॉडक्शनच्या गाण्याला अनेक गायकांनी आवाज दिला आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले होते.

मुझसे दोस्ती करोगे-
‘मुझसे दोस्ती करोगे’चे ‘द मेडले’ हे एक अंताक्षरी गाणे आहे, जे खूप मोठे आहे. हे १२ मिनिटे ९ सेकंदाचे आहे. या गाण्याला लता मंगेशकर, उदित नारायण, सोनू निगम आणि पामेला चोप्रा यांनी गायले होते. गीत आनंद बक्षी यांचे होते.

एलओसी कारगिल-
‘एलओसी कारगिल’ हा एक देशभक्तीपर चित्रपट आहे. १२ डिसेंबर २००३ रोजी, रिलीझ झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी केली नव्हती. परंतु त्याची सर्व गाणी हिट ठरली. गायकांनी एकत्र गायलेले ‘मैं कही भी रहू, हर कदम हर घड़ी’ हे गाणे १० मिनिट १८ सेकंदाचे होते. ज्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले.

बॉर्डर-
देशभक्तीपर चित्रपटांबद्दल बोलताना ‘बॉर्डर’चा उल्लेख होणार नाही, असे कसे चालेल. चित्रपट जितका हिट ठरला, तितकीच गाणीही ठरली. आजही, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी, सर्वजण ‘संदेसे आते है’ गाणे ऐकतात. हे १० मिनिट ७ सेकंदाचे गाणे आहे, ज्याने बरेच पुरस्कारही जिंकले.

शानदार-
शाहिद कपूर आणि आलिया भट्ट अभिनित चित्रपट ‘शानदार’मधील, ‘सेंटी वाली मेंटल’ हे गाणे १० मिनिटे ५ सेकंदाचे आहे. याला अरिजीत सिंग, स्वनंद किरकिरे, अमित त्रिवेदी आणि नीती मोहन यांनी गायले आहे.

मोहब्बतें-
‘मोहब्बतें’ ही एक मल्टीस्टारर फिल्म आहे, जी ब्लॉकबस्टर ठरली होती. यामध्ये शाहरूख, बिग बी आणि ऐश्वर्या राय यांच्यासह इतर कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची गाणीही तितकीच अप्रतिम होती. यात ९ मिनिटे ८ सेकंदाचे ‘सोनी सोनी अखियों वाली’ गाणे होते. हे गाणे उदित नारायण, मनोहर शेट्टी, सोनाली भटोडकर, श्वेता पंडित आणि ईशान यांनी गायले होते.

मैने प्यार किया-
जर ९०च्या दशकातील चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर मैने प्यार किया या चित्रपटाशिवाय ते अपूर्ण आहे. या चित्रपटाद्वारे सलमान खान रातोरात स्टार बनला. हा चित्रपट त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. यातील गाणीही एकापेक्षा एक होती. तसेच यातील ‘अंताक्षरी’ हे गाणे ९ मिनिटे ९ सेकंदाचे होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हम से ना टकराना! मृत्यूवर विजय मिळवणारे बॉलिवूड सुपरस्टार, बिग बींपासून ते सैफ अली खानपर्यंत ‘या’ कलाकारांचा समावेश

-दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

-जेव्हा रीना रॉय यांनी दिली होती शत्रुघ्न सिन्हा यांना धमकी, म्हणाल्या होत्या ‘८ दिवसात लग्न केले नाही तर…’

हे देखील वाचा