मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला आज कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. त्याने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. त्याचा चाहतावर्ग भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही आहे. रितेश आपल्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या- वाईट गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यासोबतच तो आपले नवनवीन फोटो, पत्नी जेनेलिया देशमुख आणि मुलांसोबत मजा-मस्ती करतानाचे व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच आता त्याने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट त्याला चाहत्याकडून मिळालेल्या खास भेटवस्तू संदर्भात आहे.
खरं तर पेंटिंग आर्टिस्ट आणि चाहता गौरव भाटकर याने रितेश आणि त्याचे वडील विलासराव देशमुख यांचे पेंटिंग भेट म्हणून दिले आहे. याचा फोटो त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने या फोटोला ‘धन्यवाद गौरव भाटकर. तुझे आर्टवर्कने माझ्या हृदयाला स्पर्श केला आहे. ही मला मिळालेल्या सर्वात खास गोष्टींपैकी एक विशेष गोष्ट असेल. नम्र आणि कृतज्ञ.’
आपल्या वडिलांच्या म्हणजेच विलासराव देशमुख यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तो आपल्या वडिलांच्या आठवणीत पुरता दंग झालेला दिसत होता. गौरवने या पेंटिंगचा व्हिडिओ आणि विलासराव यांचे चित्र रितेशला भेट म्हणून दिले.
या व्हिडिओमध्ये रितेशने म्हणाला की, “माझ्यासाठी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. गौरव यांनी या पेंटिंगमधून भावना, क्षण चांगल्याप्रकारे कॅप्चर केले आहे. माझ्या आयुष्यातील जो सार आहे, तो हा आहे. वडील काय असतात, माझ्यासाठी काय आहेत, हे या पेंटिंगमध्ये त्याने उत्कष्टपणे कॅप्चर केले आहे. धन्यवाद गौरव.”
विलासराव देशमुख यांना केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर भारतातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जायचे. त्यांनी एक नव्हे, तर अनेक पदे भूषवली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी १९९९ ते २००३ आणि २००४ ते २००८ असे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
पेंटिंग आर्टिस्ट गौरवबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे पेंटिंग बनवले आहे. यामध्ये मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सिंधुताई सपकाळ यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-“ही माझी शेवटची पोस्ट…” म्हणत आमिर खानने ठोकला सोशल मीडियाला ‘राम राम!’
-बड्डे गर्ल आलियाने ९ वर्षांच्या करियरमध्ये कमावलीय तब्बल ‘एवढ्या’ कोटींची प्रॉपर्टी