सुप्रसिद्ध गायक मिका सिंग त्याच्या वक्तव्यामुळे नेहमीच माध्यमांमध्ये झळकत असतो. त्याच्या गाण्यांव्यतिरिक्त तो इतर गोष्टींमुळेच जास्त चर्चेत असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशाच एका वक्तव्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
गायक मिका सिंगला त्याचा ‘फॉरएव्हर बॅचलर’ टॅग कायम ठेवण्याची इच्छा आहे. तो म्हणाला, की तो जीवनसाथीचा शोध घेत आहे. पण अभिनेता सलमान खानचे लग्न झाल्यानंतरच तो लग्न करेल.
मिकाने हा खुलासा इंडियन प्रो म्युझिक लीगच्या कार्यक्रमात केला. तो या शोमध्ये भाग घेणाऱ्या पंजाब लायन्स संघाचा कर्णधार आहे. कैलाश खेर, साजिद खान, शान, अंकित तिवारी, जावेद अली, असीस कौर, भूमि त्रिवेदी, अक्षिती कक्कड, पायल देव, नेहा भसीन आणि शिल्पा राव हे शोमधील इतर कर्णधार आहेत.
माध्यमातील वृत्तानुसार मिका म्हणाला की, “मी लग्नासाठी मुलगी शोधत आहे. मी स्वत: इंडियन प्रो म्युझिक लीगच्या माध्यमातून कोणीतरी शोधू शकतो, पण सलमान खानच्या लग्नानंतरच मी लग्न करेल. तोपर्यंत मी या बॅचलर आयुष्याचा आनंद घेणार आहे. साजिद भाईने आधीच सांगितल्याप्रमाणे, सलमान भाईनंतर मी इंडस्ट्रीमध्ये एकमेव ‘फॉरएव्हर बॅचलर’ आहे आणि जो पर्यंत शक्य होईल मी हा टॅग कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.”
काही वर्षापूर्वी मिकाने विनोद केला होता की, त्याच्या सिंगल राहण्यामागे, त्याचा मोठा भाऊ गायक दलेर मेहंदी जबाबदार होता. मात्र, वर्षाच्या सुरुवातीच्या काळात हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दलेरने हे नाकारले होते.
दलेर मेहंदी मुलाखतीत म्हणाला की, “मिका खरोखरच सेटल व्हावा अशी माझी इच्छा आहे. गेल्या वेळी मी त्याला भेटलो होतो, तेव्हा मी म्हणालो की तू लग्न कर. तुला खूप मुले व्हावीत अशी माझी इच्छा आहे. नाहीतर, इतका पैसा, हे सर्वकाही कुठे जाईल? मी या वर्षी प्रयत्न करेन, की त्याने लग्न करावे. यासाठी त्याला मारावे लागले तरी चालेल, पण मी त्याला घोडीवर बसवणार.”
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-