Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

मिलिंद सोमण यांनी पत्नी अंकिताला किस करतानाचा फोटो केला शेअर; ‘बेस्ट कपल’ म्हणत चाहत्यांनी केले कौतुक!

बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण नेहमी काही न काही कारणामुळे चर्चेत राहतात. कधी त्यांच्या फिटनेसबाबत, तर कधी त्यांच्या बोल्ड स्टाईलने ते चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधत असतात. काही काळापूर्वीच मिलिंद त्यांच्या नग्न फोटोंमुळे चर्चेत आले होते, ज्यामुळे ते कायदेशीर अडचणीतही सापडले. आता ते आणखी एका फोटोमुळे चर्चेत आले आहेत. त्यात ते पत्नी अंकिता कोनवारसोबत दिसले आहेत. या फोटोत मिलिंद सोमण पत्नी अंकिताला किस करताना दिसत आहेत.

हा फोटो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. जोडप्याच्या या रोमँटिक फोटोवर चाहते कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स त्यांच्या फोटोंचे रोमँटिक वर्णन करत असतानाच, बरेचजण मजेदार पद्धतीनेही कमेंट करत आहेत. अंकिता आणि मिलिंद सोमण यांच्या या फोटोवर कमेंट करत एका महिला युजरने लिहिले, “तुमच्या दोघांचा हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फोटो आहे.” त्याचबरोबर एकाने अंकिता आणि मिलिंद यांचे ‘बेस्ट कपल’ म्हणत वर्णन केले आहे.

यापूर्वी मिलिंद सोमण त्यांच्या वाढदिवशी नग्न फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत आले होते. या फोटोत ते गोवा बीचवर नग्न होऊन धावताना दिसले. मिलिंद सोमण यांच्या या फोटोवरून बरेच वादही निर्माण झाले आणि त्यानंतर गोव्यात त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. आयपीसी कलम 294 आणि आयटी टेक्नॉलॉजीच्या इतर कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मिलिंद सोमण यांचे पहिले लग्न मधू सप्रेसोबत झाले होते. मात्र, काही कारणास्तव हे जोडपे विभक्त झाले. पुढे 2006 मध्ये ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ या चित्रपटाच्या सेटवर, फ्रेंच अभिनेत्री मायलेन जाम्पानोशी त्यांची भेट झाली. जुलै 2006 मध्ये दोघांनी गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये लग्नही केले. मिलिंदचे हे लग्नही टिकू शकले नाही आणि 2009 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांनतर त्यांनी 22 एप्रिल 2018 रोजी अलिबागमध्ये अंकिता कोनवारशी लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मोहब्बते’ फेम किम शर्माचा बिकिनी घालून सोशल मीडियावर राडा! एकदा पाहाच ‘हे’ ग्लॅमरस फोटो

-‘सुशील, संस्कारी आणि घरेलू मुलीसाठी लग्नाचे स्थळ आहे का?’ लेहंग्यातील फोटो शेअर करत साराचे भन्नाट कॅप्शन

-कहर! ट्रॅडिशनल लूकमध्येही मोनालिसाच्या बोल्ड अदा, पाहा ‘हे’ हॉट फोटो

हे देखील वाचा