Saturday, May 30, 2026
Home बॉलीवूड ‘सुशील, संस्कारी आणि घरेलू मुलीसाठी लग्नाचे स्थळ आहे का?’ लेहंग्यातील फोटो शेअर करत साराचे भन्नाट कॅप्शन

‘सुशील, संस्कारी आणि घरेलू मुलीसाठी लग्नाचे स्थळ आहे का?’ लेहंग्यातील फोटो शेअर करत साराचे भन्नाट कॅप्शन

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान त्या कलाकारांपैकी एक आहे, जे त्यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सगळया गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात. प्रेक्षकांना त्यांच्याकडे आकर्षित करत असते. आधीपासूनच एक स्टारकीड असल्याकारणाने सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंग देखील चांगली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याकारणाने तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सारा तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे. त्या फोटोची झलक तिने सोशल मीडियावर वरून प्रेक्षकांना दिली आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती स्वतःला एक संस्कारी, सुशील आणि घरेलू मुलगी संबोधत आहे. साराच्या या फोटोपेक्षा तिच्या कॅप्शनने सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित केले आहे. हा फोटो शेअर करत तिने असे लिहिले आहे की, “या सुशील, संस्कारी आणि घरेलू मुलीसाठी लग्नाचे कोणते स्थळ आहे का??” सोबतच तिने अनेक इमोजीही शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिच्या सौंदर्याचे सर्वजण खूपच कौतुक करताना दिसत आहेत.

या फोटोमध्ये तिने लेहंगा घातला आहे. हा लेहंगा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याने डिझाइन केला आहे. तिने या फोटोमध्ये मरून रंगाचा एक डिझायनर लेहंगा घातला आहे. सोबतच खूप दागिने घातले आहे. या फोटोमध्ये साराचे सौंदर्य खुलून आले आहे.

सारा अली खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने शेवटचे वरुण धवन सोबत ‘कुली नंबर 1’ मध्ये काम केले होते. तसेच ती आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांसोबत साराचा हा पहिलाच चित्रपट आहे. अतरंगी हा चित्रपटात या वर्षी 6 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बघावं ते नवलंच! सामान्य पद्धतीने कपडे परिधान करण्याचा कंटाळा आल्याने, अभिनेत्रीने केलं ‘असं’ काही; पाहा व्हिडिओ

-भोजपुरी होळीगीतांची धमाल कायम! ‘निरहुआ’चं नवीन गाणं जबरदस्त व्हायरल

-एकेकाळी महान क्रिकेटपटूच्या प्रेमात असलेल्या अभिनेत्रीचा नवीन पिढीच्या तरुणींना मोलाचा सल्ला, म्हणतेय ‘विवाहित पुरुषांच्या…’

हे देखील वाचा