Monday, July 1, 2024

न ऐकलेला किस्सा : ….म्हणून अमिताभ बच्चन यांनी डावा हात खिशात टाकून केली होती ‘शराबी’ चित्रपटाची शूटिंग

कलाकार असाच मोठा बनत नसतो. त्यामागे त्याचे अतोनात कष्ट, जिद्द, कामाविषयी असलेली अफाट इच्छाशक्ती असते. या सर्व गोष्टींनंतर तेव्हा कुठे त्याला यशाची चव चाखायला मिळत असते. असेच काहीसे आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्याबद्दल, ज्यांना आपण ‘महानायक’, ‘बिग बी’, ‘शहेनशाह’, ‘अँग्री मॅन’ या नावांनी ओळखतो. तो अभिनेता इतर कुणी नसून अमिताभ बच्चन हे आहेत.

त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती आहेत. परंतु काही गोष्टी अशा असतात, जेव्हा कलाकार त्याचा खुलासा करतात तेव्हाच समजते. याचा खुलासा करण्यासाठी कलाकार सर्वात प्रभावी सोशल मीडियाचा वापर करतात. बिग बीदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. ते आपल्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच बिग बींचा सुपरहिट चित्रपट ‘शराबी’ दरम्यान कायम त्यांचा डावा हात खिशात राहत असे. त्यांनी स्वतः त्यामागील कहाणी सांगितली होती.

अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांचा ‘शराबी’ हा चित्रपट ऑर्थर या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळाले की, प्रदर्शनानंतर पुढच्या वर्षी कन्नडमध्ये रिमेक तयार झाला होता, ज्याला ‘थंडा कनिके’ असे नाव होते.

‘शराबी’ हा चित्रपट पाहून बहुतेक लोकांना असे वाटते की, अमिताभ यांचा कायम डावा हात त्यांचा खिशात ठेवायचे. कारण त्यांच्या अभिनयाची वेगळी खासियत म्हणून, पण ते तसे नव्हते. त्याचे खरे कारण म्हणजे त्यांच्या हाताला झालेली दुखापत. यासंदर्भात स्वत: अमिताभ यांनी खुलासा केला होता की, ‘फटाके फोडताना डाव्या हाताची बोटं जळली होती. पण तरीही मी शूटिंग चालू ठेवली होती.’

चित्रपट दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी त्यांना असा सल्ला दिला होता की, या चित्रपटात तुम्ही बिघडलेल्या दारूड्या मुलाची भूमिका करत आहात. त्यामुळे खिशात एक हात ठेवा, असा सल्लाही प्रकाश मेहरा यांनी त्यांना दिला होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांना अमिताभ यांची ही शैली खूप आवडली. अमिताभ व्यतिरिक्त शराबी चित्रपटातील जया प्रदा, प्राण, ओम प्रकाश यांसारख्या सर्वोत्कृष्ट कलाकारांनीही नावाजण्यात आले होते.

थोडं बिग बींविषयी
महानायक अमिताभ बच्चन यांचे नाव इन्कलाब असे असे ठेवण्यात आले होते. ‘सात हिंदुस्थानी’पासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओमध्ये आवाजामुळे त्यांना दोनवेळा नाकारण्यात आले होते, पण कमाईची सुरुवात ही एका चित्रपटाला दिलेल्या त्यांच्या आवाजातूनच झाली  होती. त्यावेळी यांच्या या कामगिरीसाठी त्यांना ३००रुपये मिळाले होते.

त्यांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. चित्रपट कुली दरम्यान त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यावेळी ते खूप दिवस रुग्णालयात दाखल होते, पण त्यातून लवकरच बाहेर पडून त्यांनी आपले काम पुन्हा सुरू केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा