Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड तरूणींनाही लाजवेल अशी सुंदरता, मलायका अरोराचे लेटेस्ट फोटो पाहून पडाल प्रेमात

तरूणींनाही लाजवेल अशी सुंदरता, मलायका अरोराचे लेटेस्ट फोटो पाहून पडाल प्रेमात

बाॅलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत असलेले नाव म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora).  मलायकाचा जन्म १९ डिंसेबर १९७३ मध्ये झाला होता. २००८ मध्ये तिने ‘ईएमआय’ सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ती तिच्या फॅशनमुळे आणि तिच्या कमालीच्या डान्समुळे प्रक्षेकांचे लक्ष वेधून घेते. ती सोशल मीडियावर खुपच सक्रिय असते. ४८ वय असूनही ती कमी वयाच्या अभिनेत्रीनांही लाजवेल इतकी सुंदर दिसते. जेव्हा कधी ती मुंबईच्या रस्त्यांवर दिसते, तेव्हा प्रत्येकांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती मोठ्या साइजच्या टीशर्ट स्वेटरमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. 

मलायकाचे हे फोटो चर्चेत आहेत. ती प्रत्येक वेळेस एका हटक्या अंदाजात दिसते आणि तिचा आत्मविश्वासही चाहत्यांना खूप आवडतो. तिने आत्तापर्यंत ‘इंडियाज बेस्ट डांसर’, ‘एम टीव्ही सुपरमाॅडेल ऑफ द इयर’, ‘बेस्ट ऑफ इंडियाज बेस्ट डान्सर’, ‘नच बलिये’ असे खूप शो जज केले आहेत.

ती १९९८ मध्ये अरबाज खान (Arbaaz Khan) सोबत विवाहबंधनात अडकली होती. २०१७ मध्ये तिचा घटस्फोट झाला. मलायका सध्या अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चेच्या रंगल्या आहेत. नुकतेच तिच्या ब्रेकअपच्या बातमीला उधाण आले होते. पण अर्जुन कपूरने पोस्ट करून ही अफवा असल्याचे कळवले. या अफवांना आळा घालण्यासाठी त्यानंतर लगेच काही दिवसांनी ते दोघे लंच डेटवरही गेले होते.

‘गंगूबाई काठियावाड़ी’ स्क्रीनिंगच्या वेळेस अनेक कलाकार पोहचले होते. तेव्हा हे लव्हबर्डही तेथे उपस्थित होते. ते दोघेही  एकाच गाडीतुन आले होते. दुसरीकडे मलायका ही तिच्या फिटनेसकडे खास लक्ष देते. तिच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक म्हणजे जिम आणि योगा क्लासला ती एकही दिवस सुट्टी देत नाही.

हेही वाचा 

हे देखील वाचा