जगात अनेक प्रकारचे लोक आहेत, ज्यापैकी काहींना पुस्तके वाचायला आवडतात तर काहींना चित्रपट बघायला आवडतात. तर काहींना पुस्तकांवर आधारित चित्रपट बघायला आवडतात. चला तर मग जाणून घेऊया, कादंबरी आणि पुस्तकांवर आधारित काही बॉलीवूड चित्रपट.
फितूर
2016 मध्ये दिग्दर्शक अभिषेक कपूरचा ‘फितूर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जी चार्ल्स डिकन्स यांच्या ‘द ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात तब्बू, कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे.
3 इडियट्स
राजकुमार हिराणी निर्मित 3 इडियट्स हा चित्रपट चेतन भगतच्या फाईव्ह पॉइंट समवन या कादंबरीवर आधारित आहे. ‘3 इडियट्स’ चित्रपटाला तीनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटात आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन मुख्य भूमिकेत दिसत आहे. हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे जो इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांवर आधारित आहे.
काई पो छे
बहुतेक आपण चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित चित्रपट पाहतो. ‘काई पो छे’ सारखे सर्वोत्कृष्ट चित्रपट देखील चेतन भगत लिखित ‘द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ’ वर आधारित आहेत. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाद्वारे सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
देवदास
सरतचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1917 मध्ये ‘देवदास’ नावाची कादंबरी लिहिली. 2002 मध्ये संजय लीला भन्साळी दिग्दर्शित देवदास हा चित्रपट याच कादंबरीवर आधारित होता. जो जोरदार हिटही ठरला.
यापैकी कोणते चित्रपट तुम्ही पाहिले आहेत, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मीच या घराची ‘सूत्रधार द बॉस’ म्हणत मंजिरीने कलात्मक पद्धतीने प्रसाद ओकला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
बरेच वर्ष जगापासून लपून रिलेशनशिपमध्ये होती कथा फेम अदिती शर्मा, नंतर केले ‘या’ अभिनेत्याशी लग्न