Monday, June 17, 2024

काही 12वी पास तर काही नापास, तरीही बॉलीवूडवर राज्य करतात ‘हे’ सेलिब्रिटी

आज आम्ही तुम्हाल बॉलीवूडच्या अशा काही सेलिब्रिटींबद्दल सांगणार आहोत जे फक्त 12वी पास आहेत. त्याचबरोबर या यादीत असेही सेलिब्रिटी आहेत जे 12वी पासही झालेले नाहीत.

कंगना रणौत
कंगनाला लहानपणापासूनच फॅशनची आवड होती. मॉडेल किंवा अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न होते, पण कंगनाच्या आई-वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे. आई-वडिलांच्या आज्ञेत राहून ती त्या वाटेवर चालत होती, पण तिचे मन मात्र दुसरीकडे होते. 12वीत नापास झाल्यानंतर कंगना घरातून पळून दिल्लीला आली होती. 12वी नापास झालेली कंगना आज बॉलीवूडमध्ये कोणत्या जागी आहे हे आपण बघू शकतोय.

अर्जुन कपूर
कंगनाप्रमाणे अर्जुन कपूरही 12वी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाला. त्यानंतर त्याने शाळेत जाणे बंद केले आणि वडिलांना मदत करण्यास सुरुवात केली. आज अर्जुनही एक यशस्वी अभिनेता आहे.

काजोल
काजोलने पाचगणी येथील बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तिने पहिला चित्रपट ‘बेखुदी’ केला. यानंतर तिच्या ‘बाजीगर’ चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. अभिनयात करिअर करण्यासाठी तिने मध्यंतरी शाळा सोडली. ती बारावी पासही नाहीये.

दीपिका पदुकोण
दीपिका पदुकोण फक्त 12वी पास आहे. ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला, पण मॉडेलिंगमधील करिअरमुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘खान असता तर लगेच…’, एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्यावर भडकले दिग्दर्शक
हे चित्रपट घालणार जानेवारी 2023मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, एकदा पाहाच

हे देखील वाचा