यावर्षी सुरुवातीच्या काळात अनेक सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित झाले, तर काही चित्रपटगृहांमध्ये. यातील काही सिनेमांनी प्रेक्षकांची मने जिंकली, तर काही सिनेमे अगदीच फ्लॉप ठरले. या यादीमध्ये अनेक सुपरस्टारच्या सिनेमांचा समावेश आहे, ज्यांच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. आज आपण अशाच सिनेमांबद्दल पाहणार आहोत.
‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’
यादीत पहिल्या क्रमांकावर आहे सुपरस्टार अजय देवगणचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा सिनेमा. सुपरस्टार अजयचा हा सिनेमा खूप वाईट पद्धतीने फ्लॉप झाला. माध्यमांतील माहितीनुसार, ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे बजेट सुमारे ६० कोटी रुपयांच्या जवळपास होते.
रूही
राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा ‘रूही’ हा सिनेमा लॉकडाऊनआधी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात जान्हवीनं एका भुताने झपाटलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. तर सिनेमात तिच्यावर प्रेम करणारा राजकुमार तिला भुताच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी खटपट करताना दिसला. अभिनेता वरुण शर्मा देखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत होता. मात्र, कोरोना आणि इतर काही कारणांमुळं हा चित्रपट देखील प्रेक्षकांना नाराज करून गेला.
हंगामा २
‘हंगामा २’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. पण ‘हंगामा २’ प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट कोणालाच आवडला नाही. शिल्पा शेट्टीचे सिनेसृष्टीत पुनरागमन आणि परेश रावल यांचे कॉमिक टायमिंगही सिनेमाला फ्लॉप होण्यापासून वाचवू शकले नाही. या सिनेमानं आयएमडीबीवर फक्त ३.१ रेटिंग मिळवली.
द गर्ल ऑन द ट्रेन
परिणीती चोप्राचा सस्पेन्स थ्रिलर आणि बहुचर्चित असणाऱ्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या, पण हा सिनेमाही सुपरफ्लॉप ठरला. पण जर तुम्ही परिणीतिचे फॅन असाल आणि तुम्हाला थ्रिल हवा असेल, तर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.
तडप
सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचं पदार्पण प्रेक्षकांना फारसं भावलं नाही. त्याच्या ‘तडप’ सिनेमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालाच नाही. तसेच तेलुगू हिट सिनेमाच्या या हिंदी रिमेकशी प्रेक्षकही रिलेट करू शकले नाही. या सिनेमात तारा सुतारियाचीही मुख्य भूमिका होती. जवळपास २५ कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या सिनेमानं जेमतेम २५ कोटी रुपये कमाई करून फ्लॉप ठरला.
बंटी और बबली २
सैफ अली खान, राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असणारा ‘बंटी और बबली २’ सिनेमाही चांगलाच आपटला. खरं तर हा ‘बंटी और बबली’ सिनेमाचा सिक्वल होता. पण बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवण्यात सपशेल फ्लॉप ठरला. ३० कोटींचं बजेट असलेला हा सिनेमा फक्त २२.१२ कोटींचीच कमाई करू शकला.
थलायवी
‘पंगा क्वीन’ कंगना रणौतचा ‘थलायवी’ हा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित सिनेमाही या यादीत सामीलय. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, प्रेक्षकांना हा तितकासा भावला नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, कंगनाच्या १०० कोटी रुपये बजेट असणाऱ्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर फक्त जवळपास ११ कोटी रुपये छापले होते. त्यामुळे हा सिनेमा वाईटरीत्या फ्लॉप ठरला.
सरदार का ग्रँडसन
अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंग यांची मुख्य भूमिका असलेला ‘सरदार का ग्रँडसन’ हा सिनेमापण फ्लॉपच ठरला. या सिनेमाची स्टोरी खूप कंटाळवाणी असल्यामुळे प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला.
सत्यमेव जयते २
‘सत्यमेव जयते २’ या सिनेमात जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार यांच्या भूमिका होत्या. माध्यमांतील वृत्तांनुसार, सिनेमाचं बजेट तर जवळपास ५५ कोटी रुपये होतं. पण बॉक्स ऑफिसवर कमाई झाली ती फक्त १७.२९ कोटी रुपयांची. त्यामुळं बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.
राधे
‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खाननं आतापर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिलेत. पण त्याच्या ‘राधे’ या सिनेमाला आयएमडीबीवर खूप कमी रेटिंग मिळाले. या चित्रपटाची स्टोरी पाहून प्रेक्षकांनी हा सिनेमा नाकारला. माध्यमांतील वृत्तांनुसार, या सिनेमाचं बजेट ५० कोटींपेक्षा अधिक होतं. पण सिनेमा २० कोटींपेक्षाही अधिक रुपयांची कमाई करू शकला नाही. त्यामुळे सिनेमा चांगलाच आपटला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एवढ्या मोठ्या सुपरस्टारने ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचवेळी का घातली १९९ रुपयांची चप्पल?, जाणून घ्या कारण