Tuesday, April 16, 2024

एवढ्या मोठ्या सुपरस्टारने ‘लायगर’च्या ट्रेलर लाँचवेळी का घातली १९९ रुपयांची चप्पल?, जाणून घ्या कारण

अभिनेता विजय देवरकोंडा याचा ‘लायगर‘ चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (दि. २१ जुलै) मुंबईत लाँच करण्यात आला. त्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ट्रेलर लाँच इव्हेंट अभिनेता रणवीर सिंग याने होस्ट केला होता. विजयसह अनन्या पांडे आणि निर्माते तिथे उपस्थित होते. यादरम्यान विजयच्या लूकची बरीच चर्चा झाली. त्याने साधा काळा टी-शर्ट, कार्गो पँट आणि चप्पल घातली होती. ‘फॅशन आयकॉन’ म्हटला जाणारा रणवीरने त्याच्या चप्पलची खिल्ली उडवत म्हणाला की, “वाह काय स्टाईल आहे.”

विजयने दिलेला सल्ला
चित्रपटातील कलाकारांचे कपडे हजारो ते लाखो रुपयांपर्यंतचे असतात. जे घेण्याचा सामान्य माणूस विचार पण करू शकत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, विजय देवरकोंडा (Vijay deverakonda) याने ट्रेलर लाँचच्या वेळी घातलेल्या चप्पलची किंमत फक्त १९९ रुपये होती. हरमन कौरने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. हरमन विजयच्या लूकवर म्हणाली, “मी खरोखरच लायगरच्या (Liger) प्रमोशनची वाट पाहत होते. अनेक ब्रँड्स आणि डिझायनर्स होते जे सतत विजयला त्याच्या लूकसाठी संपर्क साधत होते. विजयचा फोन येईपर्यंत मी चिल होते, पण तो म्हणाला, पात्रासारखाच आणि लूक सिंपल ठेवू.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

विजयला हवा होता ‘रॉ’ लूक
हरमन पुढे म्हणाली, “त्याने मला बेसिक चप्पलबद्दल विचारले आणि सुरुवातीला मी थोडी कोड्यात पडले, पण विजयच्या ड्रेसिंगच्या कल्पनेवर माझा नेहमीच विश्वास होता. कारण, मला माहित आहे की, तो चप्पल अशा प्रकारे घालतो ज्याबद्दल देशात चर्चा केली जाते. विजयने ट्रायल देखील घेतला. यासाठी सुरुवातीला त्याने बेसिक टी-शर्ट आणि जीन्स घातली होती, पण त्याला अजून रॉ लूक हवा होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

लुकबाबत नर्वस होती हरमन
विजयने १९९ रुपयांची चप्पल घातली तेव्हा हरमन खूप चिंतेच पडली होती. ती म्हणते, “मी सतत घाबरत होते कारण ही घटना मोठ्या प्रमाणावर घडत होती. विशेषतः मुंबईत आणि १९९ रुपयांच्या चप्पल घालून फिरणे हे विजयचे खरे धाडस होते, पण मला आनंद आहे की यातूनही त्याला खूप प्रेम मिळाले.”

अभिनेता विजय देवरकोंडा याचा ‘लायगर’ हा बहुप्रतिक्षित सिनेमा पुढील महिन्यात म्हणजेच २५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अनिल कपूरची मस्ती त्यालाच भोवली; एका चापटीने भागलं नाही, म्हणून जग्गू दादाकडून १७ वेळा खाल्ली कानाखाली

अवघडंय! ‘या’ सिनेमांच्या स्टोरी ढापून बॉलिवूडने बनवलेत हिंदी चित्रपट, शेवटच्या मूव्हीचे नाव वाचून बसेल शॉक

भारतीय सैन्याचा नादच खुळा! बॉम्बवर रवीनाचे नाव लिहीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भेट देण्याचा केलेला प्लॅन

हे देखील वाचा