Monday, July 1, 2024

धक्कादायक! ए.आर. रहमान यांचा मुलगा अमीन याचा मोठा अपघात; 3 दिवसानंतरही गायक शॉकमध्ये

बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायकांपैकी एक ए.आर. रहमान यांचे नाव घेतले जाते. यांच्या मुलासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गाण्याच्या शूटिंगदरम्यान एआर रहमान यांचा मुलगा अमीन याच्यासोबत मोठा अपघात झाला. जिथे सेटवरची क्रेन अचानक खाली पडली. त्यामुळे तो अजूनही या धक्क्यातून सावरला नाहीए. या अपघाताची फोटो  स्वतः अमीन याने शेअर करत झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.

संगीतकार आणि गायकांपैकी एक एआर रहमान यांचा मुलगा अमीनसोबत एक धक्कादायक अपघात झाला. गेल्या गुरुवारी एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान अमीनसोबत मोठा अपघात झाला. ज्यात त्याचा जीव थोडक्यात बचावला आहे. अमीन शूटिंग करत असताना सेटवर क्रेनमधून लटकलेला एक मोठा झुंबर अचानक खाली पडला. यादरम्यान अमीन त्या झुंबराखाली होता, मात्र तो थोडक्यात बचावला. आता 3 दिवसांनंतर त्याने या घटनेची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

या घटनेची माहिती चाहत्यांशी शेअर करताना अमीन म्हणाला, ‘मी सुरक्षित आणि जिवंत असल्याबद्दल अल्लाह, माझे आई-वडील, कुटुंब, प्रियजन आणि अध्यात्मिक गुरू यांचा मी आभारी आहे. 3 दिवसांपूर्वी मी एका गाण्यासाठी शूटिंग करत होतो. मला टीमवर विश्वास होता की त्यांनी सुरक्षेची काळजी घेतली असेल. जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत होतो, तेव्हा क्रेनला लटकलेले झुंबर खाली पडले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by “A.R.Ameen” (@arrameen)

 

अमीनने पुढे लिहिले की, ‘मी त्याच्या अगदी खाली होतो. काही इंच जरी इकडे तिकडे झाले असते किंवा काही सेंकद मागे पुढे झाले असते तर, क्रेनला लटकलेले झुंबर माझ्या डोक्यावर कोसळले असते. मी आणि माझी टीम अजूनही या धक्क्यातून सावरलो नाहीए. त्याने दुर्घटनेनंतरचे दोन फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये लटकलेली क्रेन आणि पडलेला झुंबर दिसत आहे. यासोबतच या अपघाताच्या आघातातून बाहेर पडणे त्याच्यासाठी किती कठीण आहे हेही सांगितले. (bollywood-musician-singer-a-r-rahman-son-amin-accident-trauma)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बींच्या ‘या’ गीतांशिवाय होळी सणच आहे अपूर्ण; ‘रंग बरसे’ तर आहे सर्वात हिट!
…म्हणून करिना कपूरला होळी साजरी करायला आवडत नाही, आजोबा राज कपूर यांच्याशी संबंधित आहे किस्सा

हे देखील वाचा