Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘लायकीत राहा’, असे म्हणत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने मारला अभिनेत्रीला धक्का

बॉलिवूड स्टार नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या अभिनयाने हजारो प्रेक्षकांना प्रेरित केले आहे. चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय आणि डायलॉगने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या, नवाजुद्दीन सिद्दीकीचा पहिला संगीत व्हिडिओ ‘बारिश की जाए’ नुकताच रिलीज झाला आहे. या म्युझिक व्हिडिओसह त्याचा आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेता स्टार नेहा शर्माला धक्का देत, लायकीत राहण्याविषयी बोलत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्माची जोडी लवकरच ‘जोगीरा सारा रा रा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासंबंधित एक व्हिडिओ नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये नेहा नवाजसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडीओमध्ये, नेहा नवाझुद्दीनकडे जाऊन म्हणते, ”तुम्ही मला खूप क्युट वाटता, चला एकमेकांविषयी जाणून घेऊया.” यावर उत्तर देत नवाजुद्दीन म्हणतो, “ऑवव… लायकीत राहा.”

नेहा शर्माचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ अतिशय मजेदार स्टाईलमध्ये बनविण्यात आला आहे. ‘जोगीरा सारा रा रा’ चित्रपटात अभिनेत्री नेहा शर्मा नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांचा हा गमतीदार व्हिडिओही चित्रपटाच्या सेटवरीलच आहे.

‘जोगीरा सारा रा रा’ या चित्रपटाचे शूटिंग लखनऊजवळ बाराबंकी शहरात होत आहे. चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त संजय मिश्रा आणि मिमोह चक्रवर्तीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन कुशन नंदी करत आहेत. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असेल.

अभिनेत्याच्या नवीन संगीत व्हिडिओ ‘बारिश की जाए’ मध्ये त्याने, दिग्दर्शक अरविंदर खैरा, संगीतकार जानी आणि बी प्राक यांच्यासह प्रथमच काम केले आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये सुनंदा शर्माही नवाजसोबत दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हे देखील वाचा