बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अमली पदार्थांचे जाळे उलगडत चालले आहे. इतकेच नव्हे, तर एनसीबीने प्रकरणी संपूर्ण बॉलिवूडला धारेवर धरलं आहे. यामध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली. सध्या मनोरंजन विश्वातील आणखी एक नाव या प्रकरणी समोर येत आहे. अभिनेता अरमान कोहली याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती एनसीबीच्या हाती लागली. एनसीबीच्या हाती ही माहिती लागताच, अभिनेत्याच्या घरी छापेमारी करण्यात आली. त्याच्या घरी एनसीबीने धाड टाकली, तेव्हा तो नशेमध्येच होता. त्यानंतर त्याच्या घराची कसून झडती घेण्यात आली, तेव्हा १ ग्राम पेक्षाही अधिक अमली पदार्थ एनसीबीला येथे सापडले.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखाली ही छापेमारी करण्यात आली आहे. यानंतर एका वृत्तवाहिनीला समीर वानखेडेंनी सांगिलते की, “छापेमारीननंतर अरमान कोहलीला अमली पदार्थांविषयी विचारले असता त्याने अस्पष्ट उत्तरे दिली. त्यामुळे चौकशीसाठी त्याला एनसीबीच्या कार्यालयात आणले आहे.” (bollywood ncb raids bollywood actor armaan kohli house action taken after interrogation of drug peddler)
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईमध्ये ड्रग्स प्रकरणी अनेक धागेदोरे एनसीबीच्या हाती लागत आहेत. शुक्रवारी त्यांनी अभिनेता गौरव दीक्षितला अमली पदार्थांप्रकरणी अटक केली. सुरुवातीला एजाज खानला एनसीबीने अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान गौरव दीक्षितचे नाव समोर आले. पुढील कारवाईसाठी शनिवारी एनसीबीने त्याला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने दीक्षितला ३० ऑगस्टपर्यंत एनसीबीच्या अटकेमध्ये पाठवले आहे. या दोघांना अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान अरमान कोहलीचे नाव समोर आले.
अभिनेत्री क्रांती रेडकर ही समीर वानखेडेंची पत्नी आहे. अभिनेत्री मराठी तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये झळकत असते. मराठी सिनेसृष्टीमध्ये अमली पदार्थ घेणाऱ्या कलाकारांचे प्रमाण फार कमी आहे, असे म्हणायला हरकत नाही. परंतु बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार अमली पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत. अमली पदार्थांप्रकरणाचा छडा लावण्यासाठी एनसीबीने कसून चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी एनसीबीने ‘रोलिंग थंडर’ ही मोहीम हाती घेतले आहे. यामधून एनसीबीने आता अरमान कोहलीला अटके केली असून, आता पुढे कोणत्या कलाकाराचे नाव समोर येणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य