Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड ‘पठाण’ने बाॅलिवूडला दिली संजीवनी! पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करत रचले विक्रमांचे मनोरे

‘पठाण’ने बाॅलिवूडला दिली संजीवनी! पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई करत रचले विक्रमांचे मनोरे

मधल्या काही काळापासून बॉलिवूडची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. साउथचे सिनेमे येऊन बक्कळ पैसे जमवून गेले, मराठी सिनेमांनी न भूतो न भविष्यति अशी कामगिरी केली, मात्र हिंदी सिनेमे कलाकार, कथा, सर्व काही असूनही मागे पडत होते. अनेकांनी बॉलीवूडला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान, खिलाडी कुमार आदी दिग्गज देखील या कामात अपयशी ठरले. त्यातच बॉलिवूड बॉयकॉट हा नवीन ट्रेंड आला. त्यामुळे देखील बॉलिवूड खाली गेले. प्रादेशिक सिनेमांची कामगिरी बॉलिवूडच्या तुलनेत अत्युच्च होती. अनेक मोठ्या कलाकारांचे सिनेमे अपयशाच्या छायेत असताना, बॉलिवूडचा बादशहा त्याचा हुकमी एक्का घेऊन आला ‘पठाण’च्या रूपात. अनेक सिनेमे फ्लॉप गेल्यानंतर चार वर्षांचा गॅप घेऊन शाहरुख ‘पठाण’ घेऊन आला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

‘पठाण’चा ट्रेलर, गाणी पाहून अनेकांनी त्यांचा रोष व्यक्त करत विविध बाबतीत आपला आक्षेप नोंदवला. त्यामुळे अनेकांनी सिनेमातील दिपीकाच्या काही सीन्सवर, कपड्यावर कात्री चालवण्याची मागणी केली. मात्र ही आणि अजून अनेक अडथळे दूर करत सिनेमाने बक्कळ पैसा कमावण्यास सुरुवात केली आहे. बॉलीवूडला पुन्हा एकदा तारण्यासाठी शाहरुख खान आला आणि त्याने नुसते बॉलीवूडला तारले नाही तर एका दमातच भक्कम उभे केले आहे. कोरोनानंतर बॉलीवूडला उतरती कळा लागली होती. काही चित्रपट वगळता उरलेल्या चित्रपटांना तर चित्रपट निर्मितीचा खर्च देखील काढता आला नाही. त्यामुळे मोठ्या कलाकारांसोबतच, सिनेमाशी संबंधित अनेक लहान मोठ्या लोकांवर बेरोजगारीचे संकट फिरत होते. मात्र आता किंग खानच्या ‘पठाण’ला मिळणारे यश पाहून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये नवचैतन्य संचारले असून, आता त्यांना एक नवीन आत्मविश्वास मिळाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रेकॉर्ड तोड कामगिरी केली असून, १०० कोटींची कमाई करत इतिहास रचला आहे. कोरोनंतर आर्थिक अडचणीमुळे संकटात असणारे देशभरातील जवळपास २५ चित्रपटगृह पुन्हा एकदा शाहरुखच्या सिनेमामुळे खुले झाले आहे. ‘पाठीं’ सिनेमाने अगदी घोषणेनंतरच तुफान क्रेझ निर्मण केली. जस जस सिनेमाचे पोस्टर, फोटो, गाणी टिझर प्रदर्शित झाले तशी ही क्रेझ आणि लोकांमधील उत्सुकता तुफान वाढली. ‘पठण’ची ऍडव्हान्स बुकिंग फुल्ल झाल्यामुळे बंद करण्यात आली होती. प्रेक्षकांच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘पठाण’ खऱ्या अर्थाने टिपिकल माल मसाला असणारा बॉलिवूड सिनेमा आहे. जो मागील बरीच काळापासून प्रेक्षकांना बॉलिवूडकडून अपेक्षित होता. सिनेमात ऍक्शन, रोमान्स, कॉमेडी, स्पेशल अपिरियन्स, आदी सर्वच गोष्टी उत्तम जमून आल्या आणि त्याचा निकाल म्हणजे प्रदर्शनाच्या दोनच दिवसात सिनेमाने केलेली कमाई.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

शाहरुख खानने खऱ्या अर्थाने ‘पठाण’साठी जोखीम पत्करली. वयाच्या ५७ व्या वर्षी तो जबरदस्त ऍक्शन करताना दिसला. एका सीनमध्ये ऍक्शन, दुसऱ्या सीनमध्ये विनोद तर तिसऱ्या सीनमध्ये रोमान्स हे करण्याचा त्याचा हातखंडा प्रेक्षकांना तुफान आवडतो. रोमॅंटिक हिरो असलेल्या शाहरुखला हार्डकोर ऍक्शन करताना पाहणे म्हणजे निव्वळ दुर्मिळच. पण ‘पठाण’च्या रूपाने अनेकांची ही इच्छा देखील पूर्ण झाली आहे. २०१८ साली आनंद एल राय यांचा ‘झिरो’ सिनेमा फ्लॉप गेल्यानंतर अनेकांनी त्याचे करियर संपले आता त्याने साहायक भूमिका स्वीकारावे असे अनेक सल्ले देण्यास सुरुवात केली. मात्र तो काही महिने शांत बसला आणि मोठी उडी घेत ‘पठाण’ घेऊन आला आणि सर्वांची तोंडं बंद केली. चित्रपटाला अनेकांनी चांगले म्हटले नाही, रेटिंग्स देखील खूप कमी मिळाली मात्र असे असूनही ‘पठाण’च्या फॅन्सने पठाणला तारले आणि बॉलीवूडला घवघवीत यश दाखवले.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी परदेशात ३५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतात पहिल्या दिवशी पठाणचे नेट कलेक्शन ५५ कोटींचे आहे तर ग्रॉस कलेक्शन ६५.९६ कोटींचे आहे. पठाणने ‘KGF: Chapter 2’ च्या पहिल्या दिवसाच्या ५२ कोटींच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. ‘पठाण’ने पहिल्या दिवशी जगभरात १००.९६ कोटी रुपये कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधत लोकांनी पठाण पहिला. या दिवशी सिनेमाने तब्बल ७० कोटींची कमाई केली आहे. ही घोडदौड अशीच चालू असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

तत्पूर्वी या सानमचे अजून एक कदाचित सर्वात महत्वाचे वैशिट्य म्हणजे सलमान आणि शाहरुख खान यांचे एकत्र इन. ‘पठाण’मध्ये सलमान खानने खास पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. या दोघांच्या फॅन्ससाठी ही एक विशेष बाब ठरली. दरम्यान शाहरुखशिवाय सिनेमात जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांचा दमदार अभिनय, श्रीधर राघवन आणि सिद्धार्थ आनंद यांचे लेखन, उत्तम व्हीएफएक्स, विशाल-शेखर यांचे संगीत या बाबी देखील सिनेमासाठी उजव्या ठरल्या आहेत. बेशरम रंगवरुन जरी वाद झाला असला तरी युट्यूबवर या गाण्याने मिलियन्समध्ये व्ह्युज मिळवले आहेत. एकूणच काय तर ‘पठाण’ला संमिश्र प्रतिक्रिया, रिव्यू मिळाले तरी शाहरुख खानच्या चाहत्यांनी सिनेमाला चांगलेच तारले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-
लाखो चाहत्यांना प्रेमात पाडणारी मौनी रॉय, पहिल्याच भेटीत सुरज नांबियरवर झाली होती फिदा
Ashram 3 | बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल बोलली ईशा गुप्ता; म्हणाली, ‘मी तर दहा…’

हे देखील वाचा