Saturday, April 20, 2024

Ashram 3 | बॉबी देओलसोबतच्या इंटिमेट सीनबद्दल बोलली ईशा गुप्ता; म्हणाली, ‘मी तर दहा…’

एमएक्स प्लेयरच्या लोकप्रिय वेब सिरीज ‘आश्रम’चा तिसरा सीझन रिलीझ होताच खळबळ उडाली आहे. या वेब सिरीजच्या कथेपासून ते त्यातील व्यक्तिरेखेपर्यंत, याने लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सिरीजची कथा पुढे नेण्यासाठी तिसर्‍या सीझनमध्ये काही नवीन व्यक्तिरेखा सादर करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे, ती बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताच्या (Esha Gupta) व्यक्तिरेखेची.

मागच्या सीझनमध्ये बॉबी देओल (Bobby Deol) आणि त्रिधा चौधरी (Tridha Chaudhary) यांचे इंटिमेट सीन्स चर्चेत होते. तर यावेळी ‘आश्रम ३’ मधील बाबा निराला आणि ईशा यांच्यातील केमिस्ट्री आणि इंटिमेट सीन्सने लाइमलाइट लुटली आहे. या सीन्सची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, ईशा गुप्ता हिला यात काहीच अडचण नाही. (aashram 3 esha gupta opens up on her intimate scenes with bobby deol)

अलीकडेच ईशाने एका मुलाखतीत तिच्या व्यक्तिरेखेबद्दल अनेक खुलासे केले आहेत. ज्यामध्ये ती बॉबी देओलसोबत असे सीन करण्याबाबत उघडपणे बोलताना दिसली आहे.

बॉबीसोबत सीन करण्यात ‘नो प्रॉब्लेम’
जेव्हा ईशाला या सिरीजमधील इंटिमेट सीन्सबद्दल विचारण्यात आले, तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की, हे सीन करताना तिला कोणतीही अडचण आली नाही. तिने बॉबीसोबत जे काही इंटिमेट सीन शूट केले ते परफेक्ट होते आणि त्यांनी सीन्सला पूर्ण न्याय दिला आहे. ती म्हणते, “मी गेल्या १० वर्षांपासून इंडस्ट्रीशी जोडलेली आहे आणि मी यापूर्वीही असे सीन केले आहेत. अशा सीन्समध्ये आरामदायी असण्या-नसण्यासारखे काही नाही. लोकांना वाटते की यात काही अडचण आहे. पण तसे नाही.”

पहिल्या वेळेस शूटिंग करताना होते समस्या
आपला मुद्दा पुढे करत ईशा म्हणाली, “जेव्हा मी पहिल्यांदाच असा सीन शूट केला, तेव्हा ते शूट करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण जेव्हा तुमच्याकडे परिपक्व स्टार्स आणि चांगले अभिनेते असतात, तेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. इंडस्ट्रीत असताना लोक खूप काही करत आहेत. मला वाटते की आम्ही चित्रपटांपेक्षा ओटीटीवर खूप कमी दाखवतो.”

दरम्यान ही वेबसिरीज सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. याच्या पहिल्या आणि दुसऱ्या सीझन प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तर तिसऱ्या सीझनलाही तितकेच प्रेम मिळत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाळीसहून अधिक सिनेमात काम करूनही ‘आश्रम 3’मध्ये इंटीमेट सीन देताना घाबरला होता बॉबी देओल, पण का?
हॉटेलमध्ये जेवायला गेला अन् प्रेमात पडला, अभिनेता बॉबी देओलची फिल्मी लवस्टोरी ऐकून व्हाल थक्क

हे देखील वाचा