Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड ‘शाहरुख दिल्लीचा होता अन् मी हिमाचल प्रदेशमधल्या छोट्या गावची’, म्हणत कंगना रणौतने केली ‘किंग खान’शी स्वत:ची तुलना, झाली ट्रोल

‘शाहरुख दिल्लीचा होता अन् मी हिमाचल प्रदेशमधल्या छोट्या गावची’, म्हणत कंगना रणौतने केली ‘किंग खान’शी स्वत:ची तुलना, झाली ट्रोल

बॉलिवूडची अभिनेत्री कंगना राणौतने २००६ ला ‘गँगस्टर’ चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिच्या हातात एक- एक चित्रपट असे येत गेले की, त्या प्रत्येक चित्रपटात तिने आपल्या उत्तम अभिनयाने कमाल करून दाखवली होती. तिचे हिट चित्रपट बघत १५ वर्ष कधी लोटून गेली हे समजलेच नाही. आज तिने बॉलिवूडमध्ये १५ वर्षे पूर्ण केली आहेत. २८ एप्रिल, २००६  रोजी कंगनाचा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. या आनंददायी प्रसंगी कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, तिची तुलना किंग खान अर्थात शाहरुख खानशी केली आहे. तिने सांगितले की, आजही ती बॉलिवूडमध्ये टिकण्यासाठी लढा देत आहे.

कंगनाने तिच्या गँगस्टर लूकचे छायाचित्र शेअर केले, आणि लिहिले की, ‘१५ वर्षांपूर्वी याच दिवशी गँगस्टर चित्रपट आला होता. शाहरुख खान आणि माझी सर्वात मोठी यशोगाथा आहे. पण शाहरुख खान दिल्लीचा होता, कॉन्वेंट शाळेत शिकला होता, आणि त्याच्या पालकांना चित्रपटांविषयी माहिती होती. मला इंग्रजीचा एक शब्द माहित नव्हता, अभ्यास केला नाही, आणि हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावातून आले होते.’

https://twitter.com/KanganaTeam/status/1387240591700881409

कंगनाने पुढे लिहिले, ‘माझ्या प्रत्येक पायरीवर संघर्ष होता. पूर्वी माझे वडील आणि आजोबा ज्यांनी माझे आयुष्य खूप कठीण केले होते, आणि आता १५ वर्षांच्या यशानंतर मी अजूनही लढा देत आहे, परंतु ते पूर्णपणे फायदेशीर आहे. तुम्हा सर्वांचे आभार.’

https://twitter.com/KanganaTeam/status/1387241789069791233

कंगनाच्या ट्विटनंतर चाहते तिचे अभिनंदन करत होते. तर काहींनी स्वत: ची तुलना शाहरुख खानशी करण्यास नकार दिला आहे. एका युजरने लिहिले, ‘कृपया स्वत: ची तुलना शाहरुख खानशी करू नको. कधीकधी साधी गोष्टपण बराच फरक करत असते.’ त्याच वेळी दुसर्‍या युझरने लिहिले, ‘आपल्याला स्वतः चे कौतुक करण्यासाठी दुसऱ्यांशी तुलना करणे गरजचे आहे का?’

कंगना रणौत अनेकदा ट्वीट करून प्रत्येक विषयावर आपले मत मांडत असते. यावेळी तिने आपला राग इंस्टाग्रामवर काढला आहे. कंगनाने लिहिले, ‘इंस्टाग्राम मूर्ख लोकांनी भरलेले आहे. येथे ज्यांची बुद्धी कमी आहे, त्यांचे कौतुक केले जाते.’

कंगना रणौतला चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘मणिकर्णिका’ यासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच रिलीझ होणार आहे.

कंगना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी कायमच आपले स्वतःचे मत स्पष्ट मांडत आली आहे, परंतु तिच्या या स्पष्ट स्वभावामुळे तिला खूपदा ट्रोल केले जाते. गेल्या काही दिवसात तिने असे काही मुद्दे मांडले आहेत की, ज्यामुळे ती मोठया प्रमाणात ट्रोल  झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खतरनाक! ‘या’ चित्रपटाच्या सेटवर डॉबरमन जातीच्या कुत्र्याने घेतला होता अर्जुन कपूरच्या पायाचा चावा, अभिनेत्याने शेअर केला किस्सा

-दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुन कोरोनाच्या विळख्यात, चाहत्यांसाठी दिला खास संदेश

-‘इंडियन आयडल १२’ शोमध्ये वडिलांविना दिसणार सायली कांबळे, कारण सांगताच झाले सर्वजण भावुक

हे देखील वाचा