Monday, June 9, 2025
Home अन्य ‘सिंड्रेला’ बनत अभिनेत्री निया शर्माची साराला टक्कर; फोटो पाहून नेटकरी म्हणाले ‘जो नियासे जले…’

‘सिंड्रेला’ बनत अभिनेत्री निया शर्माची साराला टक्कर; फोटो पाहून नेटकरी म्हणाले ‘जो नियासे जले…’

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अलीकडेच, निया शर्मा एका नव्या लुकसह बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानला टक्कर देताना दिसली आहे. तिचा हा फोटो बघता बघताच व्हायरल होऊ लागला आहे.

निया शर्माने नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. चाहत्यांना नियाचा हा अंदाज खूपच आवडलेला दिसून येत आहे.

https://www.instagram.com/p/CNFPntXFlU6/?utm_source=ig_web_copy_link

याअगोदर बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने एक फोटो शेअर होता, ज्यामध्ये तीही सिंड्रेलाच्या लूकमध्ये दिसली होती. नियाने अगदी सारा सारखा लुक करून तिला टक्कर दिली आहे. साराने तिचा लुक अगदी साधा ठेवला होता, मात्र, निया शर्माने या लूकला बऱ्याच बोल्ड अंदाजात चाहत्यांसमोर सादर केले आहे. या लूकमध्ये निया शर्मा खूपच बोल्ड आणि बिनदास्त दिसत आहे.

पोस्ट केलेल्या फोटोमध्ये निया अगदी सिंड्रेलासारखी दिसत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फोटो शेअर करत तिने लिहले की, “जसे पाण्यातून मासे बाहेर आले आहेत.” या फोटोंवर खूप जलद गतीने लाईक्सचा वर्षाव होत आहे. युजर्स फोटोवर वेगवेगळ्या प्रकारे कमेंट्सही करत आहेत. कमेंट करत एका चाहत्याने लिहिले, “जो नियासे जले, साईड होकर चले.”

https://www.instagram.com/p/CNE0HuMFjCx/?utm_source=ig_web_copy_link

निया शर्मा शेवटच्या वेळी, ‘नागिन 4’ मध्ये जास्मीन भसीन, रश्मी देसाई आणि विजेंद्र कुमेरियासोबत दिसली होती. या शोमध्ये नियाने इच्छाधारी नागिनची भूमिका साकारली होती. यासह, नियाने ‘खतरों के खिलाडी: मेड इन इंडिया’ची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तमन्ना भाटियाने वेगळ्याच अंदाजात केला ‘डोन्ट रश चॅलेंज’ गाण्यावर डान्स, व्हिडिओला ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-‘लग्नानंतर काम करणार नाही’, शूटिंगवर परल्यानंतर अनुष्काचा थ्रोबॅक व्हिडिओ व्हायरल

-खेसारी लालचं नवीन गाणं रिलीझ, पंजाबी गायकांनाही देतोय टक्कर; चाहत्यांकडून जोरदार प्रतिसाद

हे देखील वाचा