80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनम खान हिने 1988 मध्ये मल्टीस्टारर ऍक्शन चित्रपट ‘विजय’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, पण तिला खरी ओळख ‘त्रिदेव’ या चित्रपटातून मिळाली आणि याच चित्रपटात ‘ओय ओय… तिरछी टोपी वाले’ हे गाणे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले. ‘त्रिदेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांच्यासोबत लग्न केल्यानंतर सोनमने इंडस्ट्री सोडली होती.
आता जवळपास तीन दशकांनंतर सोनम (sonam khan) पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. माध्यमांशी बाेलताना, सोनमने खुलासा केला की, “तिला तीन वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये पुनरागमन करायचे होते, परंतु महामारीमुळे तिला आपल्या योजना थांबवाव्या लागल्या.” ती म्हणाली, “मी खूप लहान वयात चित्रपट सोडले कारण, माझे लग्न झाले आणि नंतर वैयक्तिक कारणांमुळे मला भारत सोडावा लागला.’
अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांनी तिच्या पतीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सोनम आणि राजीव राय त्यांच्या मुलासह परदेशात गेले. दोन दशकांहून अधिक काळ हे जोडपे प्रथम लॉस एंजेलिस आणि नंतर स्वित्झर्लंडला गेले. मात्र, कालांतराने त्यांचे वैवाहिक जीवन बिघडले आणि 2016 मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. तिने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितले की, “त्यावेळी माझ्या मनात काय चालले होते ते मला माहीत नाही. मला एक कुटुंब हवे होते. मला असे वाटते की. त्यावेळी होणारे परिणाम समजण्यासाठी मी खूप लहान होते. तेव्हा मी फक्त साडेसतरा वर्षांचा होती.”
आपल्या अभिनय कारकिर्दीबद्दल बाेलताना अभिनेत्री म्हणाली, “इंडस्ट्रीने मला खूप साथ दिली. मला कुठलाही पश्चाताप नाही किंवा तक्रार नाही.” साेनमचे म्हणने आहे की, “कोणत्याही दोन नायिका मैत्रिणी असू शकत नाहीत.” त्याचसाेबत अभिनेत्रीने स्पष्ट केले की, “तिचे कोणत्याही अभिनेत्रीशी कोणतेही प्रकारचे भांडणं नाहीत. तिला तिच्या पुनरागमनाला ‘सेकंड इनिंग’ म्हणायचे आहे.”
सोनम खान पुढे म्हणाली की, “आता तिला नवीन लोकांना भेटून काम करायचे आहे. तिला फक्त एकच खंत आहे की, ती इंडस्ट्रीच्या संपर्कात नाही.” यादरम्यान सोनमने खुलासा केला की, “ती तिच्या कारकिर्दीचे श्रेय दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना देते. कारण, त्यांनीच तिची यश चोप्रा यांच्याशी ओळख करून दिली होती.” आता अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज आणि नीरज पांडे अशा काही दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा माझा विचार आहे.” असे अभिनेत्रीने माध्यमांशी बाेलताना सांगितले.
साेनम खान हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘विजये’, ‘त्रिदेव’, ‘मिट्टी और साेना’, ‘आखरी अदालत’ यासारख्या दमादार चित्रपटांमध्ये काम केलं आहे.(bollywood oye oye girl actress sonam khan is going to return to bollywood after 30 years)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ऋतिकने पत्नीचा पदर सोडताच पकडला सबा आजादचा हात, पाहा व्हायरल व्हिडिओ
जेनेलियाचा शाळकरी लुक चाहत्यांना करतोय घायाळ, बेसुरी गाण्याने तरुणाइला घतली भुरळ